Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पानेवाडी इंधन प्रकल्पातील वातानुकूलित कक्षाला आग ; वेळीच आटोक्यात आल्याने अनर्थ टळला

Apr 13, 2022

शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या मनमाड नांदगाव रोड वरील पानेवाडी आणि धोटाणे शिवारात इंधन आणि गॅस प्रकल्प आहेत काल रात्री दोन वाजेच्या सुमारास यातील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीतील नियंत्रण कक्षातील वातानुकूलित ( एसीला ) अचानक बिघाड होऊन दूर निघत असल्याचे निदर्शनास आले यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न आणि वर आला आहे.

              दरम्यान या घटनेनंतर सदर कंपनीतील ऑपरेशन यंत्रणेच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला.मंगळवारी सायंकाळपर्यंत या इंधन प्रकल्पाचे कामकाज बंद होते.इंधनाच्या गाड्या भरण्याचे कामही ठप्प होते.अशी माहिती हाती आली आहे.परिणामी कंपनीच्या वाहनतळावर मोठ्या प्रमाणात इंधन वाहतूक करणारे टँकर उभे होते.                    याबाबतची माहिती अशी की येथून जवळच असलेल्या पाणेवाडी येथील हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रकल्पाच्या नियंत्रण कक्षातील वातानुकुलीत ( एसी ) कक्षाला  आग लागली . हे वृत्त  समजताच परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोखा चुकला , आग विझविण्यासाठी वाळूच्या बादल्या आणि सुमारे २० हून अधिक फायर बॉटल यांचा वापर करावा लागला.आगीचे वृत्त समजताच शेजारील भारत पेट्रोलियम मधून व यातात कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी सदरची आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.आग लागल्यानंतर आकाशात मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ पसरले होते.आगीच्या घटनास्थळापासून जवळच पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्या आहे.पण आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली . आगेवर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली . मात्र आगेच्या घटना संदर्भात कंपनी प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी हि किरकोळ बाब असल्याचे सांगितले.यामुळे नागरिकातून आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.

अजून बातम्या वाचा..

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

  मनमाड, मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीचा परीक्षेचा निकाल...

read more
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

    शाळेचे पुढील विदयार्थी गुणानुक्रमाने १ ते ५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमांक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]