Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाडच्या विद्यार्थ्यांची खेलो इंडिया विद्यापीठ व आखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरावर झेप

Apr 13, 2022

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर येथे दिनांक नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत कु दिया व्यवहारे कु नूतन दराडे कु करून गाडे यांनी आप आपल्या वजन गटात सहभाग नोंदविला होता सदर स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातील विविध विद्यापीठातील खेळाडूंनी देखील आपला सहभाग नोंदविला होता. कु दिया व्यवहारे कु नूतन दराडे ह्या दोघी महाविद्यालयाच्या खेळाडूंची आपल्या उत्कृष्ठ खेळाच्या जोरावर दिनांक २३/०४/२२ ते २७/०४/२२ रोजी जैन विद्यापीठ बेंगलोर येथे होणाऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेस निवड करण्यात आली आहे .त्याच बरोबर नुकत्याच श्रीरामपूर येथे पार पडलेल्या आंतर विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत देखील मनमाड महाविद्यालच्या ०६ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता व त्यात देखील आपल्या महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ठ खेळाच्या जोरावर महाविद्यालयाच्या कु दिया व्यवहारे ,कु खुशाली गांगुर्डे व कु साक्षी पांडे ह्यांची निवड दिनांक २१/०४/२२ ते २४/०४/२२ दरम्यान राजस्थान विद्यापीठ रायपूर येथे होणर्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पॉवर लिफ्टटिंग स्पर्धेस निवड झलेली आहे .उपोरोक्त स्पर्धेत महाविद्यालयाच्या इतर खेळाडूंची कामगिरी देखील कौतुकास्पद होती .
महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे सरचिटणीस समाजश्री डॉ.प्रशांत दादा हिरे संस्थेचे समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे संस्थेच्या कोषाध्यक्षा श्रीमती स्मिताताई हिरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.व्ही. पाटील उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर,कुलसचिव समाधान केदारे, श्री प्रवीण व्यवहारे तसेच महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ दिनेश कराड व श्री महेंद्र वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]