loader image
[ays_poll id=7]

महाविद्यलयीन विद्यर्थ्यांसाठी खूशखबर, ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ

Apr 14, 2022

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले आहे. मागील दीड वर्ष शाळा, कॉलेज ऑनलाईन परीक्षा घेत होत्या. मग या वर्षी देखील परीक्षा ऑनलाईन घ्या अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. त्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं देखील झाली आहेत. आज कुलगुरूंच्या झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यत आला आहे. ऑफलाईन परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा जास्तीचा वेळ फक्त उन्हाळी (मार्च/ एप्रिल) 2022 या परीक्षेपुरता असणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. आज झालेल्या कुलगुरुंच्या बैठकीत ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये होणाऱ्या ऑफलाईन प्रथम सत्र उन्हाळी परीक्षेसाठी वेळ वाढविण्यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून या काळात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आणला. त्याप्रमाणे शिक्षण सुरूही झाले. परंतु ऑनलाईन शिक्षण सुरू असताना त्यामध्ये लिखाणाचा सराव होत नव्हता. गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या हातातील पेनाची जागा कम्प्युटर किंवा मोबाइलने घेतली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अजून बातम्या वाचा..

शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक अखेर पुढे ढकलली...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड - शहरातील मुख्य बाजार पेठ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा + शिवसेना (शिंदे गट )...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

  नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात...

read more
शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

योगेश म्हस्के मनमाड : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
.