Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

Apr 14, 2022

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक सॅबी कोरिया, माननीय पर्यवेक्षिका सिस्टर शैला, ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रियांका साळी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती सरिता देवरे यांनी केले. श्री. सुनील कुमार कटारेसरांनी आपल्या भाषणातून तसेच नंतर गायलेल्या भिमगीतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची महती सांगितली. मा. मुख्याध्यापकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सद्गुणांची थोडक्यात ओळख करून दिली.कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी

के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी

के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली....

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु कृष्णा पानसरे याची यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु कृष्णा पानसरे याची यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]