Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भगवान महावीर यांचे तत्व विश्वाला मार्गदर्शक व उपयुक्त प्रा. सुरेश नारायणे

Apr 14, 2022


जैन धर्माचे २४वे तिर्थकर यांनी जैन धर्मात जी सत्य,अहिंसा, असत्य य ,परिग्रह,ब्रम्हचर्य हे मुळ पाच तत्व महत्वाचे सांगितले आहे. मनुष्याचा व विश्वाचा विकास व प्रगती व्हावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने या तत्वांचा अंगिकार केल्यास हिंसाचार, अत्याचार, चोरी,या गोष्टींना आळा बसेल व जनसामान्यांमध्ये सुसंवाद, व शांती ,आनंदी वातावरण निर्माण होईल असे प्रतिपादन प्रा.नारायणे केले .
येथील जैन.धर्मशाळेत भगवान महावीर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला विधीज्ञ श्री.जयकुमारजी कासलीवाल गौरव समिती व भारतीय जैन संघटना शाखा- नांदगाव आयोजित केलेल्या भगवान महावीर जयंती च्या व्याख्यानमाला-2022 चे पुष्प 21 वे गुंफताना ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अँड.जयकुमार कासलीवाल, सुशिल कासलीवाल अध्यक्ष ख.दि.जैन पंचायत,दिलिप शेठी महामंत्री ख.दि.जैन पंचायत, जसराज पारख अध्यक्ष वसंत मुनीजी छात्रावास,दत्तराज छाजेड राज्य कार्यकारणी सदस्य भारतीय जैन संघटना,डॉ. रमणलाल गादीया शहराध्यक्ष जैन संघटना,आशाताई दर्डा ‘आशाताई सुराणा महिला विभाग जैन संघटना ,पाटणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.स्वागतगीत आशाताई दर्डा व आशाताई सुराणा यांनी सादर केले. व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवर चिंतन व्हावे या उद्देशाने सन.2001 पासून समाजप्रबोधन करण्यासाठी या व्याख्यान मालेचे आयोजन भ.महावीरांच्या जयंतीच्या पुर्वसंध्येला घेण्याची प्रथा चालू असून कोरोना महामारीचा काळ सोडला तर ही व्याख्यानमाला अखंड चालु आहे.असे प्रास्ताविक पर भाषणात अँड.जयकुमार कासलीवाल यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तराज छाजेड यांनी केले. यावेळी
सकल जैन समाज बंधु व भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. सकाळी संपूर्ण शहरात प्रभातफेरी आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नांदगावचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच नांदगावचे नगराध्यक्ष राजेश कवडे, व जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पुरुषांनी सफेद वस्र तर महिलांनी केसरी साडी परिधान केली होती. शोभा यात्रेचे सुंदर असे संचलन होते. यानंतर भंडारा व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच श्री. भ.महावीरांचा पाळणा आदी कार्यक्रम घेण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]