पानेवाडी गावातील सुनील गंभीरे यांची कन्या कुमारी स्नेहल सुनील गंभीरे हिने बारावीच्या परीक्षेत ९१% टक्के गुण मिळवत नीट ची परीक्षा दिली होती ह्या परीक्षेत स्नेहल हिने उत्तम गुण मिळवून नेत्रदीपक कामगिरी करीत पालघर येथे एम बी बी एस अभ्यासक्रम पदवीसाठी निवड झाली असून या सुयशाबद्दल स्नेहल तसेच तिच्या पालकांवर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल स्नेहल हीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अंकुश तात्या कातकडे व माजी सरपंच सौ.संगीता अंकुश कातकडे यांनी गुणगौरव करत सत्कार केला व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
अस्थिर राजकीय आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिमुळेसोने 85,000 ₹ तोळा तर चांदी 90,000 ₹ किलो होण्याची शक्यता – दिपक गोयल
सोने आणि चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी व्यापार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, सोन्याने...











