संपूर्ण विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाचा आज शनिवार दिनांक दिन 06 एप्रिल 2024 रोजी 44 वा स्थापना दिन (वर्धापन दिन )
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारावर आधारीत देशातील सर्वात पहिला विरोधी पक्ष म्हणून एकात्म मानवतावाद या मुळ तत्त्वज्ञानाच्या आधारावर राष्ट्रनिष्ठा, लोकशाहीवरील निष्ठा, आर्थिक समता व सामाजिक न्याय सिध्दांतावरील निष्ठा, सर्वपंथ समभाव निष्ठा व मुल्याधारित राजनितीवरील निष्ठा या विचारांनी सुमारे 73 वर्षा पूर्वी 21ऑक्टोबर 1951 साली भारतीय जनसंघाची स्थापना स्व.डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांनी केली. प्रारंभीच्या दशकात आणि त्यानंतरही अनेक प्रतिभासंपन्न व कर्तृत्ववान कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड परिश्रमाने अखंड भारतीय स्तरावर एका देशभक्तीच्या प्रेरणेने वेगळ्या वाटेवर चालणारा राजकीय पक्ष उभा राहिला. प्रारंभीच्या काळात स्वर्गीय डॉ.शामाप्रसाद मुखर्जी सारख्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाने भारतीय जनसंघाचे नेतृत्त्व केले. त्यांच्या दुदैवी निधनानंतर स्व.पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांनी या पक्षाची धुरा सांभाळली. परंतु त्यांचेही आकस्मित निधन झाले. या दोन्ही प्रतिभासंपन्न देशभक्त नेत्यांच्या मृत्युचे गुढ अद्यापही उलगडलेले नाही. परंतु त्यांच्या जाण्यानंतरच्या विपरीत परिस्थितीत देखील स्वर्गीय नानाजी देशमुख, स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांनी समर्थ नेतृत्त्व देवून हा पक्ष वाढविला. आणीबाणी विरोधी आंदोलनाचा कालखंड हा या पक्षाच्या विकासयात्रेमध्ये पहिला टर्निंट पॉईंट ठरला. जयप्रकाश नारायण यांच्या समर्थ नेतृत्त्वात आणीबाणीविरोधात लढा दिला गेला. परंतु या आंदोलनाचे संपूर्ण संचलन स्व.नानाजी देशमुख ,स्व.अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांनी केले. त्यानंतर नानाजी देशमुख राजकारणातून निवृत्त होवून विधायक सामाजिक सेवा कार्याकडे निघाले. 1977 च्या सरकारमध्ये भारतीय जनसंघाने प्रथम सत्तेत सहभाग घेतला. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, व हिंदुत्ववादी विचाराच्या व मुल्यांच्या आधारावर सत्तेतून बाहेर पडून अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी, कल्याणसिंग, कुशाभाऊ ठाकरे जसवंतसिंह, भैरोसिंग शेखावत, विजयाराजे सिंधिया यांनी 06 एप्रिल 1980 साली मुंबई येथे भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. प्रथम राष्ट्र नंतर पार्टी नंतर स्वतः हे ब्रीद असणाऱ्या भाजपाच्या या स्थापनेचा आज 44 वा वर्धापन दिन आहे. 1980 पासून देशातील विविध भागांमध्ये असंख्य त्यागी कार्यकर्त्यांनी आपले संपूर्ण जीवन या भाजपा पक्षाच्या बांधणीसाठी वाहून दिले. 1985 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण देशात निव्वळ दोन जागा जिंकून आल्या. अशा वेळेला देशातील सर्व राजकीय पक्षांनी भाजपाची खिल्ली उडविली व कुचेष्टा देखील केली. अशा परिस्थितीत न डगमगता स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी, स्व.कल्याणसिंग, उमा भारती, स्व.सुषमा स्वराज, स्व. अरुण जेटली, स्व.प्रमोद महाजन, स्व.विजयाराजे शिंदे,स्व. जसवंतसींग यांनी नव्याने पक्षबांधणी सुरु करुन वाटचाल सुरु केली. तर महाराष्ट्रात स्व.वसंतरावजी भागवत, स्व.रामभाऊ माळगी, स्व.राम कापसे,स्वर्गीय उत्तमराव पाटील, राम नाईक, स्व.प्रमोदजी महाजन, स्व.धरमचंद चोरडिया, स्व.गोपीनाथरावजी मुंडे , नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, एकनाथराव खडसे, स्व.भाऊसाहेब फुंडकर, ना. स. फरांदे यांच्या सारख्या दिग्गज धुरंधरांनी पक्षाचा किल्ला नेटाने लढविला. 1989 साली श्री रामजन्मभूमीच्या आंदोलनात भाजपाने सक्रिय सहभाग घेतला आणि लोकसभेच्या 89 जागा जिंकल्या. आणि 1990 साली लालकृष्ण आडवाणी यांच्या समर्थ नेतृत्त्वात भाजपा श्री रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनासाठी देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद व्हावी अशी ऐतिहासिक भव्य श्रीराम संघर्ष रथयात्रा काढली. ही घटना भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या वाटचालीतील व विकासयात्रेतील दुसरा महत्त्वाचा ऐतिहासिक दुसरा टर्निंग पॉईंट ठरली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने पुढील लोकसभा निवडणूक मध्ये त्यात 1996 साली 161 , 1998 साली 181, तर 1999 साली 182 या तिन्हीही लोकसभेत जागा जिंकून अभूतपूर्व यश श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वात मिळवून देशात भाजप व मित्रपक्षांची (एन.डी.ऐ.) सत्ता स्थापन केली. 1998 ते 2004 या कालावधीत समर्थपणे देशाचे नेतृत्त्व भाजपने केले. त्यानंतर मित्रपक्षांची साथ न मिळाल्याने भाजपला 2004 मध्ये सत्ता गमवावी लागली.
2004 ते 2014 भारतीय जनता पार्टीचा सर्वात संघर्षाचा कालावधी राहिला. कारण श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी प्रकृती अस्वास्थामुळे सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. तर स्व.प्रमोद महाजन यांच्या 2006 साली झालेल्या आकस्मित निधनाने पक्षाची वाट अतिशय बिकट झाली. परंतु भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान व देशभक्त कार्यकर्त्यांनी अशाही परिस्थितीत तोंडात साखर डोक्यावर बर्फ व पायाला चक्रे आणि अंतःकरणात देशभक्तीची भावना घेवून संघटनेच्या व कार्यक्षमतेच्या बळावर पुन्हा एकदा 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत लालकृष्ण अडवाणी यांचे नेतृत्वा मध्ये 119 जागा मिळविल्या 2009 ते 2014 हा काळ ही भाजपा साठी मोठा संघर्षाचा ठरला पण सन 2013 मध्ये गोव्यात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर प्रचारक राहिलेल्या नरेंद्र मोदी यांचे कडे 2014 च्या लोकसभा निवडणूकी चे नेतृत्व सोपविण्यात आले आणि भाजपा ने नमो युगात प्रवेश केला भारताचे सर्वोच्च नेतृत्त्व व भाजपचे आजचे शक्तिशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात एप्रिल 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ने 31% मते मिळवून देशात प्रथम च स्वबळावर 282 तर मित्र पक्षा सह 336 जागा जिकल्या हा भाजपा साठी तिसरा टर्निंग पॉईंट ठरला भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच भाजपने कॉंग्रेसमुक्त केंद्र सरकार देशाला दिले. पण नियति ने डाव साधला 03 जून 2014 रोजी महाराष्ट्र ची बुलंद तोफ शांत जाली लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे साहेब यांचे दु;खद निधन झाले त्यांचे जाण्याने भाजपा चे ग्रामीण भागात मध्ये मोठे नुकसान झाले पण त्यांनी दिलेल्या आदर्श वर कार्य करीत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस च्या कुशल नेतृत्व मध्ये भाजपा स्वबळावर 123 जागा जिंकत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे स्पष्ट बहुमताचे सरकार नोव्हेंबर 2014 मध्ये स्थापन झाले त्या नंतर भाजपा ची घौडदौड देशात आणि सुरू झाली महाराष्ट्रात सन 2015 ,2016 मध्ये महानगरपालिका , नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद यामध्ये देखील भाजपने ऐतिहासिक मुसंडी मारत अभूतपूर्व असे यश प्राप्त केले आहे.आज भाजपचे देशात 20 कोटी पेक्षा जास्त सर्वसाधारण सभासद आहेत देशाच्या नव्हे तर संपूर्ण जगाच्या पाठीवर इतक्या मोठया संख्येने सदस्य असणारा भाजपा हा एकमेव राजकीय पक्ष आहे त्याचबरोबर संपूर्ण देशात भाजपची 27 राज्यात स्वतंत्र व युतीमध्ये सत्ता स्थापित झाली आहे. तर भाजपचे 09 राज्यात विरोध पक्ष नेते आहेत तर संपूर्ण देशात 404 खासदार आणि 1550 पेक्षा जास्त आमदार आणि हजारो च्या संख्येने नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महापौर, नगराध्यक्ष, सरपंच हे असणारा भाजपा एकमेव पक्ष आहे कधीकाळी सर्व दृष्टीने अस्पृश्य समजल्या जाणार्या भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करणार्यांची स्पर्धा लागली आहे. या वर्षी जून 2022 मध्ये भाजपा ने महाराष्ट्र मध्ये देखील मोठा चमत्कार घडवून शिवसेना नेते महाराष्ट्रचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे व भाजपा नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वा मध्ये जून 2022 ला पुन्हा एकदा लोकप्रिय व लोकांच्या मनातले सरकार स्थापन केले तर डिसेंबर 2023 मध्ये मध्य प्रदेश, छतीसगढ, राजस्थान या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा ने संगठन शक्ती वर एक हाती ऐतिहासिक विजय प्राप्त केला,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची रचना करतांना अगदी शेवटच्या स्तरातील व्यक्ती भारतीय सत्तेच्या उच्च स्तरावर विराजमान व्हावी हे स्वप्न पाहिले होते. भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जुलै 2017 मध्ये भारताच्या राष्ट्रपती पदावर आदरणीय श्री रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनण्याचा सन्मान देवून आदरणीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. हिच परंपरा पुढे सुरु ठेवत पुन्हा एकदा जुलै 2022 नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्वा मध्ये प्रथम आदिवासी महिला महमहिम राष्ट्रपती आदरणीय श्रीमती द्रौपदी मूर्मु यांना भारताच्या राष्ट्रपती पदा वर विराजमान करून एक नवा इतिहास भाजपा ने लिहिला 2014 ते 2019 या यशस्वी भाजपा सरकार कालखंड मध्ये नंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे सक्षम नेतृत्वाखाली भाजपने लोकसभेत 303 एवढ्या विक्रमी जागानवर विजय पताका फडकवली त्यानंतर जून 2019 मध्ये मुस्लिम भगिनींना न्याय देणारा तीन तलाक कायदा पास करण्याचे धाडस भाजपा सरकार ने केले,तर 05 ऑगस्ट 2019 ला जम्मू काश्मीर राज्याला न्याय देणेसाठी 370 कलम रद्द करण्याची हिम्मत भाजपा सरकार नेच केली तर जो शब्द शहीद श्रीराम कारसेवक ना दिला तो पाळत 05 ऑगस्ट 2020 मध्ये अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी वर भव्य श्रीराम मंदिर निर्माण करण्याचा शिलान्यास फक्त भाजपा सरकारच करू शकते नुसता शिलान्यास करून थांबले नाही तर विश्वा तील संपूर्ण हिंदू धार्मियांना अभिमान वाटेल अश्या श्रीराम जन्मभूमी वरील नव निर्मित भव्य श्रीराम मंदिरात दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी भव्य कार्यक्रमा द्वारे श्रीराम मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा केली भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करणे साठी जी. एस.. टी. सारखी सरल कर व्यवस्था भाजपा सरकार ने आणली आणि भारतीयांना गर्व वाटेल अश्या कॉल CAA कायदा मार्च 2024 मध्ये लागू केला भारताचे भविष्य उज्वल करणारा समान नागरी कायदा, जन संख्या नियंत्रण कायदा ही भाजपाच आणेल नाही तर लागू ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्वा मध्ये गेल्या 10 वर्षात देशात 300 पेक्षा जास्त लोकल्याणकारी योजना सामान्य नागरिकांना दिल्या आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी देखील केली 2020 /2021 मध्ये आलेल्या कोरोना संकटात भाजपा कार्यकर्तेनी राजकीय भेदभाव न करता अतुलनीय योगदान देत मोठी सेवा कार्य केली आयुष्यभर भाजपवर टिका करणारे व शिव्या देणारे कधी आम्हाला भाजपा त प्रवेश मिळेल अशा आशेने वाट बघून आहेत. भारतीय जनसंघ ते भाजपच्या आजच्या गौरवशाली व शक्तीशाली ऐतिहासिक वाटचालीत सर्व महान नेतृत्त्वासह देशातील निष्ठावान सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या मार्गदर्शनात , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे.पी.नड्डा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र, व कांग्रेस मुक्त भारत करण्याचा चंग बांधला आहे आगामी काळात लोकसभा निवडणुकीत अब की बार 400 पार चा नारा देत होणाऱ्या कोणत्याही निवडणूक साठी भाजपा निष्ठावंत संघटनात्मक टीम सदैव सज्ज आहे भारतीय जनसंघ आणि भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पाहिलेले शक्तिशाली हिंदुस्थान ला विश्व गुरु करणे चे स्वप्न साकार होणे साठी कार्य करू या असा दृढ संकल्प या 44 व्या स्थापनादिनी प्रत्येक सामान्य भाजप कार्यकर्त्याने करावा . भारतीय जनसंघ व भारतीय जनता पार्टी साठी आपले सर्वस्व जीवन समर्पण करणाऱ्या सर्व ज्ञात, अज्ञात कोट्यावधी कार्यकर्त्यांना या स्थापना (वर्धापन ) दिनी विनम्र वंदन
नितीन पांडे
भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तथा दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद क्षेत्रीय समिती सदस्य

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....