Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरामध्ये श्री हनुमान जन्मोत्सव मोठया भक्ती-भावाने साजरा

Apr 16, 2022

चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो , या दिवशी श्री हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला श्री हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे, त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.

मनमाड शहरातील विविध परिसरातील श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव मोठया भक्ति-भावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला , शहरातील वेशीतील श्री मारुती मंदिर , फुले चौक येथील रुद्र हनुमान मंदिर , दक्षिण मुखी मारुती मंदिर , खाकी बाग येथील हनुमान मंदिर , पंचमुखी मारुती मंदिर , काटे मारुती मंदिर , कँप परिसरातील हनुमान मंदिर , बुधलवाडी येथील श्री हनुमान मंदिर आदि शहरातील सर्वच प्रमुख हनुमान मंदिरांमध्ये आज सूर्योदयाच्या वेळी पुजा-आरती करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी दुपारी महाप्रसादाचे अयोजन करण्यात आले होते.

शहरातील भाविकांनी हनुमान मंदिरांमध्ये दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]