स्व.दौलतराव कवडे मल्टिपर्पज को-आँप सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध निवड झाली असून चेअरमन पदी विश्वास कवडे तर व्हाईस चेअरमन पदी डॉ. दिनेश मराळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आ.सुहास कांदे व जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.सोसायटीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत कर्जवसुली १००℅ होत आहे. चेअरमन व्हा.चेअरमन निवडीप्रसंगी संचालक चंद्रशेखर कवडे,राजेश कवडे, किशोर वर्मा,सचिन काकळीज, आशिष रत्नपारखी, ज्ञानेश्वर घोडके, भागवत सोर,प्रभाकर कोळी,माणिक काकळीज, अलका कवडे,आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय औरादकर यांनी काम पाहिले.त्यांना सचिव बाळासाहेब पवार यांनी सहकार्य केले.
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार
दोन जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा व उझबेकिस्थान येथे झालेल्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेतील पदक...









