loader image
[ays_poll id=7]

राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ; राजद्रोहाचा गुन्हा दाखल

Apr 24, 2022


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची भूमिका आता अमरावतीचे खासदार नवनीत राणा त्यांचे पती आमदार रवी राणा यांची चांगलीच महागात पडली आहे. या प्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आज त्यांना वांद्रे हॉलिड कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वांद्रे कोर्टाचे न्यायाधीश ए.ए.घनीवाले यांनी हा निर्णय दिला आहे. दरम्यान त्यांच्या जामीन अर्जावर आता 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे. न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे रवी राणा यांना आर्थर रोड कारागृहात तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात पुढील 14 दिवस काढावे लागणार आहे. आज कोर्टात सरकारतर्फे अॅडव्होकेट प्रदीप घरत तर राणा दाम्पत्यातर्फे अॅडव्होकेट रिझवान युक्तिवाद करत होते

पोलिसांकडून रिमांड कॉपीतून राणा दाम्पत्यांच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी कोर्टाकडे करण्यात आली होती. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही राणा दाम्पत्यांवरील आरोप गंभीर असल्याचे म्हणत ही मागणी लावून धरली. मात्र राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी ही अटक बेकायदेशीर असल्याची म्हणत राणा दाम्पत्याच्या पोलीस कोठडीचा तीव्र विरोध दर्शवला. तब्बल 20 मिनिटे हा युक्तीवाद सुरु होता. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहे. या दोघांवर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 135 अ, 34, r/w 37(1) 135 नुसार कारवाई करण्यात आली. त्याच्यावर वेगवेगळ्या समुदायांमध्ये द्वेष पसरवल्याचा आरोप आहे. तर 353 कलमाअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल आहे. सरकारी कामात व्यत्यय आणल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणालाही जाण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते, तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मात्र तरीही मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापर त्यांनी हनुमान चालीसा पठणाचे आव्हान दिले. नोटिशीला न जुमानता राणा दाम्पत्याने शासनाला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळे त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.