Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे लोकनेते व्यंकटराव हिरे यांची जयंती साजरी

Apr 24, 2022

म. गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दि. 24/04/2022 रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेचे आधारवड लोकनेते व्यंकटराव हिरे यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे व लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रा एन. डी पगार होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून लोकनेत्यांचे कार्य विशद केले. मोसम खोरे व माळमाथ्याची जनता कै.व्यंकटराव हिरे यांचे ऋण कधीच विसरणार नाही.इतके भरीव कार्य त्यांनी कले आहे. राजकारण, शिक्षण व सहकार या तिन्ही क्षेत्रातील लोक नेत्यांची कामगिरी आपल्या व्याख्यानातून प्रा. पगार यांनी सांगितली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.पाटील यांनी लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला .राजकारण,शिक्षण व सहकार या तिन्ही क्षेत्रात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्याप्रमाणेच लोकनेत्यांनी या तिन्ही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली. शेतकरी, आदिवासी व दलित समाजावर लोकनेते व्यंकटराव हिरे यांचे अपार प्रेम होते. आणि त्यांनी ते कृतीतून सिद्ध केले. जिल्ह्यातील धरण, पाझर तलाव,व गाव तळी निर्माण करून कै.व्यंकटराव हिरे यांनी पाणीपुरवठा योजना राबवून पाणी समस्या कायमची सोडविली. धडाडी, संघटन कौशल्य व करारीपणा हे तिन्ही गुण त्यांच्यात होते. लोकनेत्यांना सत्तेचे केंद्रीकरण पसंत नव्हते. त्यांची लोकशाहीवर निष्ठा होती. लोकशाहीच्या मूल्यांसाठी लढणे हाच त्यांचा ध्यास होता.इत्यादी विचार त्यांनी मांडले.
सदर कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ प्रमोद आंबेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री पी के बच्छाव, श्रीमती जे.आर. पालवे कुलसचिव समाधान केदारे महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

मनमाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी चलवळीचा बालेकिल्ला असलेल्या जमधाडे चौक...

read more
नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव : प्रतिनिधी येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास...

read more
उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज सोमवारी भस्म...

read more
नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

मनमाड - मार्च महिन्यातच जिल्ह्यात तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोचल्याने उष्णतेची लाट जाणवू लागली आहे....

read more
ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

मनमाड - सालाबादप्रमाणे  1986 पासून सलग 38 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]