कोविड काळातील घरपट्टीवरील व्याज माफ करण्यात यावे या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगनरावजी भुजबळ यांना देण्यात आले. गेल्या दोन वर्षात कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शहरातील नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे बिघडलेले असून नगरपालिकेतर्फे आकारण्यात येणारी घरपट्टी देखील नागरिकांकडून भरली गेलेली नाही. नगरपालिका थकबाकीवर द.सा.द.शे.२४% या दराने व्याज आकारणी करते. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना या व्याजाचा अधिक भर सोसावा लागत असल्यामुळे सदर व्याज माफ करण्यात यावे, या आशयाचे निवेदन मनमाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ना.भुजबळ यांना येवला येथील संपर्क कार्यालयात देण्यात आले. तसेच मनमाड शहरातील म.ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यासाठीचे देखील निवेदन ना.भुजबळ यांना यावेळी देण्यात आले. सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लागतील असे आश्वासन ना.भुजबळ यांनी यावेळी दिले. सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड, योगेश जाधव, अल्प.सेलचे हबीब शेख, ओबीसी सेल चे शुभम आहेर, अक्षय देशमुख, आनंद बोथरा आदि उपस्थित होते.
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी
मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....










