Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पानेवाडी गावाजवळ इंधनाचा एक टँकर नाल्यात उलटला; हजारो लिटर इंधन रस्त्यावर

Apr 27, 2022

पानेवाडी गावाजवळ आज दुपारी इंधनाचा एक टँकर नाल्यात उलटल्यामुळे हजारो लीटर इंधन रस्त्याने वाहू लागले. ही घटना परिसरातील नागरिकांना कळताच काहीनी मिळेल त्या भांड्यांमध्ये हे इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पानेवाडी गावाजवळ आज दुपारी इंधनाने भरलेला टँकर एम.एच.19 झेड- 9988 हा टँकर नाल्यामध्ये उलटला. टँकर इंधनाने भरलेला असल्यामुळे सर्व इंधन रस्त्यावर सांडले. रस्त्याने इंधन वाहू लागले. त्यामुळे नागरिकांनीही ड्रम, पातेले घेऊन येत इंधन भरुन नेले. ही घटना कंपनीला कळाल्यानंतर तातडीने कंपनीचे अधिकारी, कर्मचारी क्रेन आणि फोम बाटल्या घेऊन आल्याने पुढील अनर्थ टळला. नवीन रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे खडीचे गंज पसरलेले आहेत. त्यामुळे टँकर उलटल्याचे कळते. मागील पंधरा दिवसांपूर्वी ही याच मार्गावर एका दुचाकीस्वार अपघातात गंभीर जखमी झाला होता. इंधन कंपन्यांचे टँकर्स ची वर्दळ तसेच आसपास च्या वस्त्या आणि गावांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने कायम ह्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]