Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

देशाची सेवा केल्यानंतर समाजाची सेवा हेच ध्येय ठरवून व्यतित करत आहेत जीवन

Apr 27, 2022


सैनिकी सेवेतुन सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा सरकारी गैरसरकारी सेवेची संधी उपलब्ध असते पण आमच्या जनजाति कल्याण आश्रम मनमाडचे कार्यकर्ते श्री रंगनाथजी कीर्तने यांनी असा कुठलाही विचार न करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच आपले कार्य आहे असे ठरवून १९८१ पासुन संघ शाखा आणि त्या माध्यमातून येणारी जबाबदारी यांचेच नियमित पालन केले आणि प्रसंगानुरूप जे कार्य वाटयाला येईल त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला
मनमाड भाजपाचे पहिले अध्यक्ष,विश्व हिंदू परिषदेच्या श्रीरामजन्मभूमि आंदोलन आणि श्रीराम रथयात्रा यासाठी चे आवश्यक कार्य भाजपा पूर्व सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि मग डॉ बबनराव धारवाडकर,बाळासाहेब गटने, चांदवडकर सर मधुभाऊ घाणेकर वी पी कुलकर्णी अशा समवयस्क सहकारी मित्रांसह वनवासी कल्याण आश्रम या खरोखर गरजु लोकांसाठी सर्व प्रकारची मदत,सहकार्य करण्यासाठी या मंडळीनी नाशिक जिल्ह्यात अत्यंत महत्वपूर्ण कार्य केले याचा परिणाम असा की आज कनाशीच्या वसतिगृहाची संपूर्ण जबाबदारी मनमाड शाखेवर आहे आणि श्री कीर्तने यांच्या मार्गदर्शनात नविन कार्यकारिणीतील सर्व कार्यकर्ते अतिशय चोख पणे ही जबाबदारी पार पाडत आहेत
आज श्री कीर्तने यांचा ८७ वा वाढदिवस साजरा करत असताना आपणा सर्व कार्यकर्त्यांची एकजूट आपसातील सामंजस्य आणि कामाची चिकाटी या सर्व गोष्टी बघितल्या तर हे कार्य नक्कीच वाढेल आणि या ही वयात कीर्तने ह्यांची तळमळ, उत्साह आणि कार्याप्रती निष्ठा पाहिली तर त्यांचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याची संधी आपल्याला मिळेल याची खात्री वाटते असे प्रतिपादन रा स्व संघ सेवा शिक्षण विषयाचे मालेगांव जिल्हा प्रमुख प्रमोद मुळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले त्यानंतर रमाकांत मंत्री यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले
श्री मोहन कीर्तने, श्री नरेंद्र कीर्तने,श्री प्रकाश नाना कुलकर्णी, श्री श्रीधर सांगळे आदीनी कार्यक्रमाचे आयोजन केले व कीर्तने कुटुंबीय,बारसे परिवारातील मित्र परिवार व संघ आणि जनजाति कल्याण आश्रम मनमाडचे प्रमुख कार्यकर्ते व विशेष करून श्री चांदवडकर सर ,अनिल काकडे, मदन पांगुळ अरविंद सोनटक्के व जिल्हा कार्यकर्ते श्री गणेश व्यवहारे श्री सुनील नाईक तसेच प्रांत कार्यकर्ते श्री प्रकाश गाडगीळ ही मान्यवर मंडळी उपस्थित होती
या निमित्ताने श्री कीर्तने यांनी आपल्या वयाची ८६ वर्षे पूर्ण केल्याबद्धल जनजाति कल्याण आश्रमाला ₹८६००/ ची देणगी मनमाड शाखा सचिव श्री शशिकांत भागवत आणि कोषाध्यक्ष श्री डी टी पवार यांच्याकडे सुपुर्द केली
अध्यक्ष प्रकाश नाना कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले आणि एक हॄद्य कार्यक्रम संपन्न झाला

कार्यक्रमानंतर नुकत्याच दिवंगत झालेल्या श्रीमती धारवाडकर मॅडम ( डॉ जयंत राव धारवाडकर यांच्या पत्नी) आणि कै सौ गीता पेंडसे ( हेमंत पेंडसे यांच्या पत्नी) यांना श्रद्धाजली वाहण्यात आली

अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]