मेष :- लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. तरुण वर्गाला नवीन संधी मिळेल.
वृषभ :- मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत. भावंडांचे सहकार्य मिळेल. आवडत्या कामासाठी वेळ मिळेल.
मिथुन :- कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील.
कर्क :- जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल.
सिंह :- भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. कलेचे योग्य कौतुक केले जाईल.
कन्या :- उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. स्थावरची कामे मार्गी लागतील.
तूळ :- काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहावे. प्रलोभनाला बळी पडू नका.
वृश्चिक :- वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खरेदी करावी. काही कामात अधिक श्रम घ्यावे लागतील. कामात उतावीळपणा करून चालणार नाही.
धनू :- स्वभावात काहीसा हेकटपणा येईल. हातात नवीन अधिकार येतील.
मकर :- चिकाटीने कामे कराल. जबाबदारीने वागणे ठेवाल. कमिशन मधून चांगली कमाई होईल.
कुंभ :- स्थावरच्या कामात यश येईल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल.
मीन :- सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. सट्टा, जुगार यातून चांगली कमाई होईल.




