Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी शहरामध्ये साजरी…..

Apr 28, 2022

मनमाड : ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, हे वचन ऐकल्यावर डोळ्यासमोर जी मुर्ती उभी राहते ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज अर्थात अक्कलकोट स्वामी यांची.

श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत. पौराणिक आधारानुसार, चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो. तर स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील ‘वटवृक्ष समाधी मठ स्थानी’ माध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली , असे मानले जाते. आज श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे. इ.स. 1459 मध्ये, माघ वद्य 1, शके 1380 या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. त्त्यानंतर 300 वर्षानंतर अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. पुढे स्वामींनी अनेकांना आपल्या अवतार कार्याची प्रचिती देऊन इसवी सन 1878 मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला.

मनमाड येथील दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने सात दिवस अखंड नाम ,जप , प्रहारे , यज्ञ , श्री गुरुचरित्र , श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे पारायण आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जीवनातील संकटांशी सामना करताना जिद्ध,हिम्मत,प्रामाणिकपणा व मेहनत करणाऱ्यांच्या पाठीशी कायम श्री स्वामी समर्थांची शक्ती उभी असते,असे प्रतिपादन समर्थ चारित्र्याच्या अभ्यासिका स्वाती गुजराथी यांनी येथे व्यक्त केला.मा. नगराध्यक्ष श्री राजेंद्र पगारे यांच्या हस्ते स्वामींची महाआरती करण्यात आली.

अक्कलकोट स्वामी समर्थांच्या समाधी दिनानिमित्त येथील समर्थ केंद्रात आयोजित सप्ताहाचा समारोप गुरुवारी झाला , यावेळी दुग्धाभिषेक, पूजा, पारायणसमाप्ती,होम हवन, विष्णुसहस्त्रनाम ,महाआरती व प्रसादाचा लाभ दत्त मंदिर प्रांगणात हजारो भाविकांनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील समर्थ मंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

अजून बातम्या वाचा..

धुळे मुंबई एक्सप्रेसला  मनमाडकरांसाठी तीन अतिरिक्त बोगी राखून ठेवाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

धुळे मुंबई एक्सप्रेसला मनमाडकरांसाठी तीन अतिरिक्त बोगी राखून ठेवाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मनमाड रेल्वे स्थानक महत्त्वपूर्ण जंक्शन असून या स्थानकातून रोज नाशिक मुंबई आदी ठिकाणी मोठ्या...

read more
मनमाड, नाशिक येथील प्रवाशांसाठी मुंबई – मनमाड स्पेशल ट्रेन सुरू करावी खासदार हेमंत गोडसे यांची केंद्रिय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

मनमाड, नाशिक येथील प्रवाशांसाठी मुंबई – मनमाड स्पेशल ट्रेन सुरू करावी खासदार हेमंत गोडसे यांची केंद्रिय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

नाशिक - रेल्वे प्रशासनाने नव्याने आखलेल्या रेल्वे गाड्यांच्या टाईमटेबलमुळे नाशिकसह मनमाडकरांवर...

read more
मंगळणे येथील आदिवासी महिला सरपंचाचे तीन महिन्याच्या बाळासह बेमुदत उपोषण सुरूच.

मंगळणे येथील आदिवासी महिला सरपंचाचे तीन महिन्याच्या बाळासह बेमुदत उपोषण सुरूच.

नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव तालुक्यातील मंगळणे येथील अदिवासी महिला सरपंचाच्या उपोषणाचा आज सातवा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]