Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात खातेदार आणि अल्पबचत प्रतिनिधी एकवटले ; अवसायकांच्या लेखी आश्वासानंतर उपोषण मागे

Apr 29, 2022

शहरातील जनता नागरी सहकारी पतसंस्थामधील अल्पबचत मुदत ठेवी वारंवार मागणी करून देखील खातेदारांना परत न मिळाल्यामुळे नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवीदार आणि अल्पबचत प्रतिनिधींनी बुधवार पासून आमरण उपोषण सुरू केले होते. काल गुरुवार(दि.२८ रोजी बँकेचे अवसायक पी.बी.पाडवी यांच्या लेखी आश्वसानानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले.

जनता पतसंस्थेचे अवसायक पी.बी.पाडवी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व उपरोक्त संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था नाशिक यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार त्यांनी विशेषांकात संस्थेचे १० मे २०२२पर्यंत लेखापरीक्षण पूर्ण होऊन लेखापरीक्षण अहवाल सादर केला जाईल व सदर लेखापरीक्षण अहवालामध्ये अफरातफर व आर्थिक गैरव्यवहार असल्यास संबंधित लेखापरीक्षक हे संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करतील असे लेखी पत्र पी.बी.पाडवी यांनी संदीप सांगळे व इतर २८ उपोषणकर्त्याना दिले. प्रदिप धिवर,गणेश शिंदे,रविंद्र सोनार,संदिप उबाळे, प्रियंका धोंडके,गंगाधर भावे,धनंजय देशपांडे,चेतन सरोदे,प्रविण जाधव,गणेश नवले,हेमराज जंगम आदि अल्पबचत प्रतिनिधी व ठेवीदार ग्राहक आमरण उपोषणाचा मध्ये सहभाग घेतला. या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा देखील दिला.

अजून बातम्या वाचा..

शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार कांदे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार कांदे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

मनमाड शहरात सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत मालेगाव नाका...

read more
महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल येथे खासदार चषक तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल येथे खासदार चषक तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

मनमाड :- महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल मनमाड येथे दि.२७-५-२०२३ पासून खासदार भारतीताई पवार चषक टेनिस...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]