loader image
[ays_poll id=7]

चांदवडच्या हेल्पिंग हँड ग्रुपची अनाथ व गरजू मुलांप्रती सामाजिक बांधिलकी : सायकल तसेच शालेय साहित्याचे वाटप

Apr 30, 2022


चांदवड- कोरोना काळात आई व वडील गमावलेल्या अनाथ तसेच पाच ते दहा किलोमीटर पायी शाळेत जाणाऱ्या गरजू व गरीब मुलांना सायकल तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप चांदवड तहसीदार प्रदीप पाटील,संगमनेर येथील साई समर्पण फाउंडेशनचे संस्थापक डॉ.संदीप अरगडे व आशिष ताजणे, नायब तहसीलदार मीनाक्षी गोसावी,डॉ.भालचंद्र पवार,डॉ.सतीश गांगुर्डे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
‘हेल्पिंग हँड’ या ग्रुप ने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून अनेक मदतीचे जोडून समाजातील वंचित व गोरगरीब लोकांसाठी वेळोवेळी धावून जाणारा, उपयोगी पडणारा ग्रुप म्हणून स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनाथ व गरजू मुलांना सायकल व शैक्षणिक साहित्य वाटपासाठी त्यांना चांदवड शहरातील अनेक मान्यवरांनी आर्थिक योगदान दिले.त्यात संगमनेर येथील समर्पण फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.संदीप अरगडे व आशिष ताजणे,डॉ.सुशीलकुमार शिंदे,डॉ.हेमराज दळवी,डॉ.शशिकांत गवळी,डॉ.विष्णू पालवे,डॉ.सतीश गांगुर्डे,डॉ.भालचंद्र पवार,सरुबाई भंडारे,राम गुंजाळ,मुक्तार शेख,संतोष सूर्यवंशी,मनोज कोतवाल,विवेक अग्रवाल,विशाल ललवाणी,प्रकाश खालेकर, संजय दादा तांबडे,किशोर शिंदे,राहुल सोनवणे आदी मान्यवरांनी योगदान दिले.
कोराना काळात अनाथ झालेल्या डोंगरगाव येथील आशा पगारे, हर्षल पगारे या विद्यार्थ्यांना तसेच नूतन माध्यमिक भाटगाव शाळेतील कार्तिकी जाधव,गायत्री गांगुर्डे,गणेश माळी या गरजू मुलांना सायकल व शैक्षणिक साहित्य वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू थोरे यांनी तर आभार प्रदर्शन हर्षल गांगुर्डे यांनी केले.
याप्रसंगी चित्रकार देविदास हिरे,कवी रावसाहेब जाधव,राम क्षत्रिय,कवी सागर जाधव,पांडुरंग भाडंगे,विकी गवळी,पत्रकार धनंजय पाटील,राम बोरसे,नितीन फंगाळ,दीपक निकम,सुनील काळे,अमोल गांगुर्डे, नितीन ठाकरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमच्या शालेय विद्यार्थ्यांना 3 सायकल,3 स्कुल बॅग, व 22 शूज ची अमूल्य अशी मदत करणारे शुभ हात म्हणजे चांदवड चे मा.तहसीलदार श्री.प्रदीपजी पाटील साहेब आणी हेल्पिंग हॅन्ड चांदवड ग्रुप सर्व सदस्य व सर्व अदृश्य हात तसेच हेल्पिंग हॅन्ड ग्रुप चे मुख्य प्रतिनिधित्व करणारे युवा पत्रकार हर्षल गांगुर्डे यांचे तसेच भाटगाव शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री.कृ.बा. लोखंडे सर, मा.पर्यवेक्षक श्री.आ.वि.सोनवणे सर व सर्व स्टाफ यांचे तर्फे सर्वांचे शतशः धन्यवाद मानण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.