loader image
[ays_poll id=7]

वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे जनावरे देखील घेत आहे सावलीचा आसरा

Apr 30, 2022


मनमाड (योगेश म्हस्के): सध्या उन्हाळा ऋतु सुरू असुन वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत आहे , या उष्णतेचा परिणाम हा फक्त माणसांनाच नव्हे तर मुक्या प्राण्यांना देखील खुप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

गेल्या काही वर्षांपासुन निसर्गाच्या झालेल्या बदलांमुळे सर्वच ऋतूंवर याचे परिणाम होत आहे , सध्या उन्हाळा ऋतु सुरू असुन प्रचंड उष्णता ही वातावरणात जाणवत आहे . सध्या अनेक शहरातील तापमान हे 40 ते 45 अंशापर्यंत जात असुन याचे परिणाम हे मनुष्यांप्रमाणेच मुक्या प्राण्यांवर देखील जाणवत आहे. असेच एका मनमाड शहरातील भटक्या बैलाचे छायावृत्त आपण बघत आहोत , भर दुपारच्या उन्हामध्ये हा मुकाप्राणी दुपारी उन्हामुळे एका बंद दुकानासमोर लावलेल्या छत्रीच्या सावलीचा आसरा घेताना आपण पाहत आहोत . अशाच प्रमाणे मोठया प्रमाणात ऊन्हापासुन बचाव करण्यासाठी मुक्या प्राण्यांचा प्रयत्न चालु असतो , आपण प्रत्येकांनी आपली जबाबदारी समजुन उन्हाळ्यात या आपल्या मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करायला हवा....


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.