loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुका कुमार गट व किशोर गट निवड चाचणी स्पर्धा ६ ते १० मे दरम्यान मनमाड मध्ये

May 1, 2022

नांदगाव तालुका कुमार गट व किशोर गट मुले निवड चाचणी स्पर्धा 2021- 22.

नांदगाव तालुक्यातील नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेल्या सर्व कबड्डी संघांना सूचना करण्यात येते की ,वाल्मिकी बॉईज क्रीडा मंडळ मनमाड व नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने किशोर गट व कुमार गट कबड्डी मुले स्पर्धांचे आयोजन शुक्रवार दिनांक 6 मे २०२२ ते मंगळवार दिनांक 10 मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत नांदगाव तालुकास्तरावर नोंदणीकृत संघांना भाग घेता येईल .कुमार गटासाठी वयोमर्यादा वय वर्ष 21 च्या आत म्हणजे 1 एप्रिल 2001 नंतर ची जन्मतारीख असावी.
तर किशोर गटासाठी वयोमर्यादा ही वय वर्ष १६ च्या आत म्हणजे 1 एप्रिल 2006 नंतर ची जन्मतारीख असावी .त्यासाठी वजनाची अट नाही. आपले संघ हे ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3 मे 2022 पर्यंत नोंदवावेत. ऑनलाइन संघ नोंदविलेल्या संघांनाच या स्पर्धेत खेळू दिले जाईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी ऑनलाइन नोंदणीसाठी राजेश दराडे सहसचिव नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन मोबाईल नंबर 9834480743 यांच्याकडे करावी .उशिरा नोंद करण्यात आलेल्या संघांना प्रवेश दिला जाणार नाही .याची नोंद घ्यावी .या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंचे क्रीडा सराव शिबिर घेण्यात येईल व या निवडलेल्या खेळाडू मधून लीग कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले जाईल. स्पर्धेचे ठिकाण जय भवानी अद्ययावत व्यायाम शाळा ,मनमाड . सदर स्पर्धेची प्रवेश फी प्रत्येक संघास रुपये १००/-आहे. प्रत्येक संघांच्या खेळाडूंची नोंदणी जिल्हा असोसिएशन कडे झालेली असावी. प्रवेश फी,संघ नोंदणी व खेळाडू नोंदणी सहसचिव श्री.राजेश दराडे यांच्याकडे करावी व या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन सहकार्य करावे.असे आवाहन स्पर्धा सचिव श्री शरद बहोत. डॉ.दत्ता शिंपी सचिव ,नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन . अध्यक्ष राजाभाऊ पगारे ,नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन व सर्व सदस्यानी केले आहे

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.