loader image
[ays_poll id=7]

आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके आणि अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्समध्ये रुग्णाची संपूर्ण सुरक्षा

May 2, 2022


अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल कार्यक्षम सेवाप्रदान करण्यासाठी लोक-केंद्रित दृष्टीकोन स्वीकारतो. ज्यामुळे आरोग्यसेवेच्या तरतूदीदरम्यान रुग्णांना होणारे धोके, त्रुटी आणि हानी कमी होते. त्रुटींपासून शिकण्यास शिस्तबद्ध राहून, मानक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, दररोज सुधारणा करून आणि रुग्णांना त्यांच्या काळजीच्या प्रत्येक टप्प्यावर संलग्न करून हे साध्य केले जाते. रूग्णांच्या सुरक्षिततेबद्दल बोलतांना, डॉ. व्हॅलेन्स ओवेन अँड्र्यू – मुख्य वैद्यकीय अधिकारी, मेडिकव्हर ग्लोबल, पोलंड म्हणाले की, “आम्ही सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज आहोत. ज्यामुळे रुग्णाची संपूर्ण सुरक्षितता सुनिश्चित करताना आम्हाला दर्जेदार आरोग्य सेवा देता येते. रुग्णांच्या सुरक्षिततेच्या उच्च पातळीसाठी आमच्या रुग्णालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये किमान प्रतिकूल घटना, औषधोपचार त्रुटी आणि शून्य आरोग्यसेवा-संबंधित संसर्ग आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही दक्ष आहोत.”

  •  रुग्णांच्या सुरक्षिततेकडे पाहण्याचा दृष्टीकोन:

रुग्णालयात चोवीस तास सेवा देणारा आपत्कालीन विभाग हा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग समजला जातो. भौगोलिक दृष्ट्या पाहता उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील 20 दशलक्ष लोकांपर्यत आम्ही आरोग्यसेवा देत आहोत. रुग्णाची काळजी केवळ निदान आणि उपचारांपुरती मर्यादित नाही. तर प्रत्येक क्षण आणि प्रत्येक रुग्णाची डिस्चार्जच्या अगोदर योग्य ती काळजी घेतली जाते. रुग्ण रुग्णालयात दाखल असण्याचा काळ रुग्णाच्या आरोग्य आणि सुरक्षितते मध्ये गणला जातो. अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख. म्हणाले कि ,हॉस्पिटल, मधील काही विभाग मोठ्या प्रमाणावर काम करत आहे ज्यामुळे ते रुग्णांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत वेगळे आहेत. या मध्ये खालील प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे, औषधोपचार-संबंधित प्रतिकूल घटनांमध्ये घट,सेप्सिस केअरचे ऑप्टिमायझेशन ,संक्रमणांची घटलेली संख्या ,रुग्णालयात पुन्हा दाखल होण्याचे प्रमाण कमी ,औषध प्रशासनातील त्रुटी कमी ,अद्ययावत इलेक्ट्रॉनिक वैद्यकीय रेकॉर्डचे जतन ,विभागांमध्ये सुनियोजित समन्वय ठेवणे.या घटकाचा समावेश आहे. अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्स नाशिक या ठिकाणच्या लोकांच्या आरोग्य सेवेच्या अनुभवात एक नवा निकष प्रस्थापित करत आहे आणि दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या आयुष्याला स्पर्श करत आहे.

रुग्णांच्या सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि यावर मेडीकव्हरची भूमिका स्पष्ट करण्यासाठी, भारताचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश प्रभू म्हणाले की, “आम्ही आमच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाची काळजी अशी घेतो कि , जिथे रुग्ण आशा घेऊन येतात आणि आनंदाने जातात. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण त्यांना सुरक्षित वाटू आणि त्यांची काळजी घेऊ. म्हणूनच सर्वोत्कृष्ट काळजी अत्यंत सुरक्षिततेसह देण्यासाठी अधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या सर्व मानक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही आमच्या सेवा वितरण प्रणालीची बहु-स्तरीय गुणवत्ता तपासणी आणि त्रुटींची व्याप्ती वगळण्यासाठी आमच्या कर्मचार्‍यांना प्रत्येक वेळी आम्ही योग्य ते प्रशिक्षण देत आहोत .

  • अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलबद्दल थोडक्यात :

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल, नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ आरोग्यसुविधा देणारे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलची वास्तू प्रशस्त व विस्तीर्ण असून प्रत्येक विभाग वेगवेगळ्या मजल्यावर आरक्षित आहे.त्याच बरोबर प्रत्येक मजल्यावर स्टाफ व डॉक्टर्स हे संपूर्ण वेगवेगळे आहे.
अत्याधुनिक सुविधा, अत्यंत अनुभवी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, निदान यंत्रणा, अत्याधुनिक उपकरणे आणि वेळेवर निदानासाठी प्रगत तंत्रज्ञानासह पसरलेले आहे. आणि उपचार हे त्यांच्या सर्व वैशिष्ट्यांमध्ये उत्कृष्टता आणते

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांकडून एकाच छताखाली योग्य ते निदान व उपचार केले जातात. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन औषधोपचारांची गरज असेल त्यांच्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या आणि उच्च शिक्षित वैद्यकीय स्टाफ च्या देखरेखेखाली उपचार केले जातात. आधुनिक सुखसोयी आणि तंत्रज्ञान यांचा जोड असलेले अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे रुग्णांसाठी सर्वसमावेशक पर्याय म्हणून काम करत आहे


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.