loader image
[ays_poll id=7]

१९८ अन्नदेवता शेतकरी बंधू भगिनींना कृषी पुरस्कार प्रदान !

May 2, 2022


कृषि क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या १९८ अन्नदेवता शेतकरी बंधु-भगिनींचा आज नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय कृषि पुरस्कार वितरण समारंभ मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे (दुरदृश्य प्रणालीद्वारे) तसेच राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार आणि महसुल मंत्री मा.बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
अन्नदेवता शेतकरी बांधवांच्या कृषी पुरस्कारांच्या रकमेत ५ पटीने वाढ करणार असल्याचे
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेने राज्याच्या कृषी पुरस्कारांमध्ये ५ पटीने वाढ करण्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली.
शेतकऱ्यांना शेतीतील बीयाण्यांचे, खताचे व पीकांचे योग्य पद्धतीने नियोजन करण्याकरीता गावपातळीवर कृषी ग्रामविकास समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल विक्रीसाठी मदत व्हावी या उद्देशाने स्वतंत्र टास्क फोर्स गठीत करण्यात येत असून, उत्पादित मालावर योग्य प्रकारे प्रक्रीया करण्यासाठी कृषी व अन्न संचालनालयाची स्थापना करण्यात आली आहे. आगामी काळात कोणत्याही शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार बीयाणे व खतांचा पुरवठा करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटूंबियांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी परसबागेच्या माध्यमातून उत्कृष्ट वाणाच्या बीयाणांची व्यवस्था केली जाणार आहे. ज्यामुळे शेतकरी स्वत:साठी शेतात भरडधान्य, विविध प्रकारचे पालेभाज्या व फळभाज्या यांचे पीक शकतात.
शेतीपीक, शेतीमाल विक्री व शेती विषयक मार्गदर्शनासाठी ५००० शेतकऱ्यांची रिसोर्स बँक म्हणून निवड केली असून आधुनिक शेती प्रयोगासाठी शेतकरी बांधवांना याचा निश्चितच उपयोग होणार आहे.

या पुरस्कार वितरण समारंभास पालकमंत्री श्री.छगन भुजबळ,मंत्री श्री.संदीपान भुमरे,विधानसभा उपाध्यक्ष श्री.नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री श्री.विश्वजित कदम, आ.सर्वश्री हिरामण खोतकर, आ.दिलीप बनकर, आ.माणिकराव कोकाटे, आ.नितीन पवार, पद्मश्री पुरस्कारप्राप्त मा.राहीबाई पोपेरे यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी, पुरस्कार प्राप्त शेतकरी बंधु-भगिनी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्याचे प्रतिनिधी आणि अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
.