loader image
[ays_poll id=7]

निवडणूक आयोग लागले कामाला ; महापालिकांच्या निवडणुका लवकरच

May 11, 2022


कोरोना महामारीमुळे रखडलेल्या महापालिका निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. सुप्रीम कोर्टाने २आठवड्यात राज्य सरकारला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्य सरकारने निवडणूक आयोगासोबत बैठक घेऊन प्रक्रियेस सुरुवात केली आहे.
निवडणूक आयोगाने आज याबाबत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने महापालिकांना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी डेडलाईन दिली आहे.

11 मे – अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण करणे

१२ मे – प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणुक आयोगाकडे मान्यता पाठवावी

१७ मे – अंतिम प्रभाग रचना अंतिम प्रसिद्ध करावी

१७ मे – अंतिम प्रभाग रचना यादी शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर कोल्हापूर अकोला सोलापूर नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण डोंबिवली महापालिकांना निवडणूक आयोगाने पत्र पाठवले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग अॅक्शन मोडमध्ये आलाय. राज्य शासनानं ट्रिपल टेस्ट आणि इम्पिरिकल डेटा सादर न केल्यानं या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत. याप्रकरणी 12 जूनला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.