Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड येवला मार्गावर भीषण अपघात, चार जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू :शहरावर शोककळा

May 11, 2022

मनमाड – येवला रोडवरील अनकवाडे शिवारात कार रात्री झालेल्या भीषण अपघातात चार तरुण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे.मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.या अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचुर झाली आहे.अपघातात तौफिक शेख,दिनेश भालेराव ,प्रवीण सकट,गोकुळ हिरे हे जागीच ठार झाले तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. याबाबत चे सविस्तर माहिती अशी की हे पाच ही मित्र काल येवल्याकडून मनमाडला येत असताना येवल्याकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनर ने कट मारल्याने चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी समोरील झाडावर जाऊन आदळली.यात या चार ही जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सकाळी वाऱ्यासारखी शहरात पसरताच संपूर्ण मनमाड शहरावर शोककळा पसरली आहे

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]