११ मे १८८८ रोजी मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने ज्योतीबा फुलेंना “महात्मा” ही पदवी प्रदान केली. त्यामुळेच ११ मे या दिनाला महत्व प्राप्त झाले आहे, श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्य ११ मे हा दिवस २०१६ पासुन (गेल्या ६ वर्षांपासुन) “महात्मा दिन” म्हणून महाराष्ट्राबरोबर ईतर राज्यांतही साजरा करत आलेला आहे. त्याचेच औचित्य साधुन ११/५/२०२२ रोजी सकाळी ९ वाजता नांदगाव येथे महात्मा फुले यांना पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.त्याप्रसंगी संतोष अण्णा गुप्ता, वाल्मिक जगताप सर, प्रसाद भाऊ सोनवणे,नगरसेवक वाल्मिक टिळेकर, सरपंच सचिन जेजुरकर, बाळासाहेब खैरनार सर, कचरू भाऊ त्रिभुवन,सुधाकर अण्णा निकम, संजू भाऊ पवार,खलील शेख व इतर फुले-शाहू-आंबेडकर प्रेमी उपस्थित होते.
सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...








