loader image
[ays_poll id=7]

मनमाड – वंजारवडी – कऱ्ही बस पुन्हा सुरु करावी :युवती सेनेची मागणी

May 11, 2022


युवती युवासेनेने विध्यार्थी व विध्यार्थीनींची दखल घेत मनमाड बस आगाराचे व्यवस्थापक पी.लाड वंजारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मनमाड शहर युवतीसेना, युवासेने तर्फे मनमाड आगार व्यवस्थापक श्री पी लाडवंजारी यांची बस आगारात जाऊन महिलाआघाडी उपजिल्हासंघटक संगिता बागुल, महिलाआघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, नाजमा जाफर मिर्झा, युवती युवासेना तालुकाअधिकारी नेहा जगताप, उपतालुकाअधिकारी पूजा छाजेड, मनमाड शहरअधिकारी अंजली सूर्यवंशी, सॉफी सोनावणे, बुशरा शेख, कोमल भालेराव, शीतल आरने, शमीरा शेख, उजवला मिसर, श्रुती मिसर, पायल मिसर, मानसी गंगेले, श्रेष्टी मिसर आदीं शिस्तमंडळाने भेट घेतली व कित्येक वर्षांपासून बंद असलेली मनमाड ते माळेगाव बस सेवा पुन्हा सुरू करावी अशा आशयाचे निवेदन दिले. वंजारवाडी, कर्ही, माळेगाव या गावातील विध्यार्थीनींची संख्या मोठी आहे. या सर्व परीसरातून साधारण 150 ते 200 विध्यार्थी शिक्षण घेण्यासाठी मनमाड शहरात येतात. त्यांना नियमित शिक्षणासाठी मनमाडला ये जा करण्यासाठी एकही बस नाही. मागील काही वर्षांपूर्वी नियमित बस सेवा सुरू होती. पण काही कारणाने ती बस सेवा तात्पुरत्या स्वरुपात बंद केली होती. परंतु नंतर पुन्हा ती बस सुरू न झाल्याने अनेक विध्यार्थीचे शिक्षण बस सेवे अभावी हाल होत आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याची दखल घेतली नाही.
वंजारवाडी, कर्ही, माळेगाव येथील सर्व विध्यार्थी या समस्येमुळे आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. कारण त्यांचे शिक्षणचं यामुळे बंद होण्याची वेळ आलेली आहे. तसेच परीसरातील शेतकरी बांधव व नागरिकांसाठीही बससेवा खूप गरजेची आहे. बससेवा चालू नसल्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाला सुद्धा फटका बसला आहे.
बस थांबे बनवून तयार आहेत तरी नागरिकांना बससेवेची वाट पहावी लागत आहे. या सर्व बाबीं लक्षात घेऊन तसेच या प्रश्नाचा प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून सदरील बससेवा त्वरित सुरू करावी ही मागणी युवती युवासेनेने निवेदनाद्वारे केली.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.