loader image
[ays_poll id=7]

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये परिचारिका ‘सेवाव्रतीं’चा सन्मान

May 13, 2022

सेवा परमो धर्म : या सुविचारातील अर्थाप्रमाणे सेवा हाच सर्व श्रेष्ठ धर्म आहे. याची प्रचिती सध्या आपणांस येत आहे ती परिचारिकेंच्या सेवेने…..
जागतिक परिचारिका दिवस निमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे परिचारिका सन्मान सोहळ्यात डॉ. सुशील पारख अध्यक्षीय भाषणात म्हणाले, कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असतो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची अहोरात्र सेवा परिचारिका या करीत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचे, त्यांना आनंद देण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत असतात. करोनासारख्या महाभयंकर संकटकाळात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. कुटुंबांची, मुलांची, प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून परिचारिका आपली सेवा अत्यंत चोखपणे बजावाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही. हे त्यांनी स्वतःच्या कार्यकालातील दाखले देऊन सांगितले.
या “ जागतिक परिचारिका दिवस ” निमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये परिचारकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सन्मान सोहळ्यात विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित हि करण्यात आले, या सन्मान सोहळ्यास अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख , केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर, नर्सिंग सुपरिंटेंडेंट मनीषा कोलते ,वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष सन्मान सोहळ्यात परिचारिका विषयी कृतज्ञता: व्यक्त करताना समीर तुळजापूरकर म्हणतात,करोना काळात सातत्याने होणारा बदल आत्मसात करून धीरोदत्तपणे या लढ्याला तोंड दिले, याचे कौतुक करावे तितके कमी आहे. यापुढील काळातही सर्व परिचारिका अशाच पद्धतीने कार्यरत राहतील,’ असा विश्वास व्यक्त करून परिचारिकांचे कौतुक केले.

रुग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करून, त्या रुग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी धडपड असते ती “परिचारिकांची” उपचारांदरम्यान डॉक्टरांच्या सेवेशिवाय रुग्णांना जास्त आपलेपणा जाणवतो तो या परिचारिकांमुळेच. असे प्रतिपादन हृदय शल्य चिकित्सक डॉ धनंजय बन्सल यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त करून सभागृहातील उपस्थितांची विशेष दाद मिळवली.

फोटो कॅप्शन : मेडिकल डायरेक्टर डॉ.सुशील पारख , केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर , मार्केटिंग हेड संदीप सोनुने , मानव संसाधन विभाग प्रमुख सुमित राजोरा , नर्सिंग सुपरिंटेंडेंट मनीषा कोलते , मेडिकल सुपरिंटेंडेंट डॉ आक्रष चौधरी , ऑपरेशन हेड आशिष सिंग ,आणि आदी

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.