loader image
[ays_poll id=7]

अतिरिक्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियाजनातील ५ टक्के राखून ठेवणार : राज्य शासनाचा निर्णय

May 14, 2022


जिल्हा नियोजन समितीस मिळणाऱ्या निधीपैकी ५ टक्के निधी शिक्षणासाठी राखून ठेवण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला असून राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त निधी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून देण्यासही सरकारने मान्यता दिली आहे.
शिक्षणासाठी योजना राबवण्याचा प्राधान्यक्रम निश्‍चित करण्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती, वर्ग खोली विशेष दुरुस्ती, स्वच्छतागृह दुरुस्ती करीता या निधीचा उपयोग होईल. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती, वर्ग खोल्यांचे बांधकाम, स्वच्छतागृह बांधकाम, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प आणि स्वच्छतागृह बांधकाम, पिण्याचे पाणी, शालेय स्वच्छता, वाचनालय, शैक्षणिक बोलक्या भिंती, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र कक्षाचे बांधकाम, क्रीडांगण-पटांगण तयार करणे, शाळांना संरक्षक भिंती बांधणे इत्यादी कामे करण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे. आदर्श शाळांमध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी निधी उपयोगात आणता येईल. विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, इंटरनेट-वायफाय सुविधा उपलब्ध करता येतील.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
.