मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध डेज व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यात पाककला, साडी डे, पारंपारिक वेशभूषा, मेहंदी स्पर्धा, मिस मॅच डे, गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धा व डेज मध्ये वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला.
याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुभाष अहिरे, पर्यवेक्षक डी. बी. सोनवणे, पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. सांस्कृतिक विभागामार्फत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा आर. एन वाकळे व कनिष्ठ महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमोल देसले व सर्व सहकाऱ्यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

मस्तानी अम्मा उर्स कमिटी 2025 नांदगाव चे अध्यक्षपदी अय्याज शेख यांची निवड
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मस्तानी अम्मा उर्स कमिटी 2025 नांदगाव चे...