महाराष्ट्रातल्या प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नेमक्या कधी होणार याचा फैसला आता सुप्रीम कोर्टात १७ मे रोजी होणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने आपली याचिका सुप्रीम कोर्टात मेन्शन केली असता कोर्टाने त्यावर सुनावणीसाठी १७ मे दुपारी दोन वाजेची वेळ निश्चित केली आहे. महापालिका नगरपंचायती सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद ग्रामपंचायती ऑक्टोबरमध्ये घेण्याची विनंती करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्यासाठी मुभा देणार का? याचे उत्तर १७ मे रोजी कळणार आहे.
फलक रेखाटन – नवरात्रोत्सव २०२५ नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ रुपांची आराधना
नवरात्रोत्सव २०२५ नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ रुपांची आराधना केली जाते. नवरात्री हा देवी दुर्गा...







