loader image
[ays_poll id=7]

महावितरणची मान्सूनपूर्व कामांना गती; ५० टक्के कामे पूर्ण

May 14, 2022

देखभाल दुरुस्तीसाठी बंद करावा लागतो वीजपुरवठा

 ग्राहकांनी सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन

दरवर्षी महावितरणकडून मान्सूनपूर्व आगमनाअगोदर  विद्युत यंत्रणेची  देखभाल  व दुरुस्तीची कार्ये केली जातात,  यामध्ये विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह नियोजन करून इतर महत्वाची  कामे केली जातात जेणेकरून पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. नाशिक परिमंडलात  ही कामे  गतीने सुरू असून जवळपास ५० टक्के पेक्षा जास्त कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांची  तात्पुरती गैरसोय होत असली तरी पावसाळ्यामध्ये  ग्राहकांना अखंडीत वीज मिळावी म्हणूनच ही कामे केली जातात. तरी ग्राहकांनी संयम राखून या काळात सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे

विद्युत यंत्रणांच्या  देखभाल  व दुरुस्तीचे काम करायचे असल्यास  सदर कार्य  करण्यासाठी त्या भागातील वीजपुरवठा खंडित करावाच लागतो.  त्यामध्ये सर्व भागच वा विद्युत वाहिनी खंडित न करता टप्प्याटप्प्याने कामे करून  तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरुस्ती कामे केली जातात. ही कामे पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन जास्त वेळ बंद राहू नये म्हणून उंच वाढत असलेल्या  झाडाच्या फांद्या  विद्युत यंत्रणेला  स्पर्श करीत असेल तर  त्या फांद्या तोडणे, फुटलेले पीन आणि इंसुलेटर बदलणे,  तपासणी व दुरुस्त करणे, रोहीत्रांचे ऑईल तपासणी, ऑइल गळती थांबवणे,वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहनांचे तात्पुरती असलेले जॉईट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली,जीर्ण झालेल्या वायर बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदलणे,  उपकेंद्रातील सर्व यांत्रिक बाबीची व यंत्रणा यांची तपासणी करणे व त्याची दुरुस्ती करणे तसेच प्रत्यक्ष वेळेवर आढळणाऱ्या त्रुटी दीर करून  अशा प्रकारची अनेक कामे गतीने केली जातात. मात्र सदर कामे  गतीने करीत असताना काही काळासाठी वीजपुरवठा खंडित केला जातो. 

 महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे  मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सर्व अभियंते व कर्मचारी यांना विद्युत सुरक्षितता बाळगून ही कामे योग्य ती काळजी घेऊन गतीने करण्याबाबत निर्देशित केले आहे. त्यानुषंगाने ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा म्हणून हे पावसाळ्यामध्ये यंत्रणा ठप्प न होता अखंडीत पुरवठा व्हावा आणि त्यामुळे ग्राहकांना अखंडित सेवा मिळावी म्हणून ही कामे करत असतात. सोबतच ही कामे  करण्याअगोदर ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे सुद्धा यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते आणि ही कामे  योग्य प्रमाणात विभाजन करून त्या प्रकारे एक एक भाग बंद  करून ही कामे केली जातात. ही कामे केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा जोरदार वादळी वारा व पावसामुळे झाडे, फांद्या पडून तारेवरील  डिक्स इंसुलेटर वर आकाशातील वीज पडून यंत्रणेचे नुकसान होत असते त्यामुळे त्यानंतरसुद्धा महावितरणची  यंत्रणा पूर्ववत व  सुरळीत करण्यासाठी कार्य केल्या जाते. मात्र अगोदर प्रतिबंधात्मक उपाययोजना  केल्यामुळे  गतीने वीज पुरवठा सुरळीत करण्यास मदत होते. वाढत्या तापमानामूळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव आहे.  देखभाल दुरुस्तीची  कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी असून तरी ग्राहकांनी या काळात  थोडासा संयम राखून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

फोटो ओळ:  देखभाल  व  दुरुस्तीचे काम करताना जनमित्र 

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.