loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील बहुचर्चीत मटन मार्केट अखेर जमीनदोस्त

May 17, 2022

नांदगाव तालुक्यात सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील शाकांबरी व लेडीं नदीला आलेल्या महापूरा ने शहराचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते
महापूराच्या पार्श्वभूमीवर व  मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि भुसावळ रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक निरीक्षण अहवाला नुसार मटन मार्केट वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याने आज अखेर  मटन मार्केटसह गांधी चौक फरशी पुलावरील तसेच समता मार्ग(पंचाळ गल्ली) येथील अतिक्रमण काढण्यात आले. कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून कारवाईच्या वेळी सकाळ पासून बंदोबस्त लावण्यात आला होता..
आज सकाळी मुख्यधिकारी तथा प्रशासक विवेक धांंडे यांना
मटन माक्रेट मधील अतिक्रमण धारकांनी आठ दिवसाचा अवधी मिळावा अशी मागणी केली होती. मात्र अवधी मिळणार नसल्याचे मुख्यधिकारी धांडे यांनी स्पष्ट सांगितले.अखेर मटन मार्केट मधील गाळे धारकांनी मार्केट मधील  सामान हलविण्यासाठी काही वेळेचा अवधी देण्यात यावा अशी मागणी केली ‘काही वेळेचा अवधी देण्यात आला. त्यानंतर मटन मार्केट हटविण्यात आले .त्यानंतर गांंधी चौक फरशीवर पुलावरील अतिक्रमण धारकांनी स्वता:हुन आपली अतिक्रमणे (टपरी) काढून घेतली यानंतर समता मार्ग(पंचाळ गल्ली) टपरी धारकांनी आम्हाला सुध्दा टपरी हटविण्यासाठी वेळ मागून घेतला..काही तासानंतर स्वताहून टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत..तसेच नवीन शॉपिंग सेंटरच्या जवळपास असलेले अतिक्रमणे काढण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अतिक्रमण मोहिमेत मुख्याधिकारी  तथा प्रशासक विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कुटे, बंडू कायस्थ, गणेश पाटील, अरुण निकम, मनमाड प्रभारी इंजिनिअर मयूर चौधरी,सुनील पाटील, अमृत काजळे श्रीमती मोरे, धनवटे, चोपडे, आनंद महिरे, तसेच मनमाड अग्निशमन दल,मनमाड नगरपरिषद कर्मचारी सहभागी झाले होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.