loader image
[ays_poll id=7]

कलाशिक्षक श्री.देविदास हिरे यांना राज्यस्तरीय ‘अक्षर गौरव पुरस्कार २०२२’ जाहीर.

May 19, 2022

‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड. जि.नाशिक. चे आदर्श कलाशिक्षक श्री.देविदास शिवराम हिरे. यांना पंढरपूर जि.सोलापूर.येथे दि.२८ व २९ मे २०२२ रोजी होणाऱ्या ‘माझी शाळा,माझा फळा’ आयोजित अक्षर संमेलनात मान्यवरांचे हस्ते हा अक्षर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेर आपल्या जादुई फलक रेखाटनातून समाज जागृती करून फलक रेखाटनास विशिष्ट दर्जा प्राप्त करून देणारे श्री.हिरे यांचे या संमेलन प्रसंगी फळ्यावरील लाईव्ह व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक ठेवण्यात आले आहे.
अनेक दिग्गज नामवंत कलावंतांच्या विविध कलांचा प्रात्यक्षिक सोहळा बघण्याचा योग पंढरपूर वासीयांना व महाराष्ट्रातील कला रसिकांना या अक्षर संमेलनाचे निमित्ताने होणार आहे.
श्री. देविदास हिरे यांना ‘अक्षर गौरव पुरस्कार २०२२’ जाहीर झाल्याबद्दल शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्री.का.पां. गांगुर्डे.,कार्याध्यक्ष श्री.एकनाथराव शेटे. कार्यवाह श्री.मधुसूदन गायकवाड. सहकार्यवाह श्री.कवडे. शाळेचे मुख्याध्यापक श्री.कृ.बा.लोखंडे, पर्यवेक्षक श्री.आ.वि. सोनवणे. सर्व शिक्षकवृंद व भाटगाव ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.