Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगावला दुचाकी व कार ची समोरासमोर धडक : एक ठार, दोन जखमी

May 20, 2022

नांदगाव – औरंगाबाद रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटार सायकल व टोयोटो कंपनीची कार यांच्यात अपघात होवून एक जणाचे  दवाखान्यात नेत असताना निधन झाले तर एक जण गंभीर जखमी झाला
याबाबत वृत असे की नांदगाव शहरा जवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटार सायकल व टोयोटो कंपनीची कार एम . एच . १५ डी एस ९३९० यांच्यात समोरा समोर अपघात होवून मोटार सायकल चालक समाधान जगंलू गायकवाड ( रा. इंदीरानगर कळमधरी) यांचे मालेगाव येथे दवाखान्यात नेत असतानां निधन झाले तर मागे बसलेला विलास शंकर धोत्रे हा गंभीर जखमी झाला असून त्यास मालेगाव येथे दवाखान्यात भरती केले आहे. अपघात होताच मोटारसायकल हवेत उंच उडाली व तिने पेट घेतला यामध्ये मोटारसायकल जळून पुर्ण खाक झाली . कारचालक घनश्याम हनुमंत निकम रा पंचवटी नाशिक हे जखमी झाले असून त्यांच्यांवर नांदगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार चालू आहे.
नांदगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून पुढील पो. नि. रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शना खाली पो. ह. राजू मोरे हे करीत आहे.

अजून बातम्या वाचा..

संत तुकाराम महाराज २० जूनला तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे प्रस्थान २१ जूनला.

संत तुकाराम महाराज २० जूनला तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे प्रस्थान २१ जूनला.

अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून होता त्या आषाढी वारीची घोषणा झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असो तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असो तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे राष्ट्रपती पदकाने सन्मान झाल्याबद्दल...

read more
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा :नांदगाव नगरपरिषद प्रशासन करीत आहे अक्षम्य दिरंगाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचा आरोप

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा :नांदगाव नगरपरिषद प्रशासन करीत आहे अक्षम्य दिरंगाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचा आरोप

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा नांदगाव शहरात नियोजित ठिकाणी येथे ३१ मे रोजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]