आज दिनांक ७ मे २०२२ रोजी येथील मनमाड न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन न्यायाधीश शलाका लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या प्रसंगी न्यायाधीश गणेश घुले तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड.सुधाकर मोरे यांनी मार्गदर्शन केले. या लोक अदालतीत या प्रसंगी एकूण १६३ प्रकरणे निकाली काढण्यात आली त्यात एकूण दाखल पूर्व ८८ प्रकरणे तसेच न्यायप्रविष्ट ७५ प्रकरणे असे एकूण१६३ प्रकरणे निकाली काढण्यात आली तसेच २३,४७,८६८ इतक्या रकमेची वसुली करण्यात आली.उपाध्यक्ष ॲड.पालवे,सेक्रेटरी ॲड.चोरडिया,खजिनदार ॲड.निकम,सहसचिव ॲड.बापट, ॲड. पांडे, ॲड. संसारे, ॲड. पठान, ॲड. देसले ॲड. बनकर, ॲड. नासिर खान, ॲड.यास्मिन शहा, ॲड.मूलचंदनी, ॲड. मल्हार, ॲड. एस.पी.पाटील, ॲड.आनंदा पाटील,न्यायालयीन कर्मचारी,बँक नगरपालिका पतसंस्था चे प्रतिनिधी, पक्षकार हजर होते.पॅनल प्रमुख म्हणून ॲड. गांधी व ॲड गुप्ता मॅडम यांनी काम पाहिले.














