Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगावला दुचाकी व कार ची समोरासमोर धडक : एक ठार, दोन जखमी

May 20, 2022

नांदगाव – औरंगाबाद रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटार सायकल व टोयोटो कंपनीची कार यांच्यात अपघात होवून एक जणाचे  दवाखान्यात नेत असताना निधन झाले तर एक जण गंभीर जखमी झाला
याबाबत वृत असे की नांदगाव शहरा जवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटार सायकल व टोयोटो कंपनीची कार एम . एच . १५ डी एस ९३९० यांच्यात समोरा समोर अपघात होवून मोटार सायकल चालक समाधान जगंलू गायकवाड ( रा. इंदीरानगर कळमधरी) यांचे मालेगाव येथे दवाखान्यात नेत असतानां निधन झाले तर मागे बसलेला विलास शंकर धोत्रे हा गंभीर जखमी झाला असून त्यास मालेगाव येथे दवाखान्यात भरती केले आहे. अपघात होताच मोटारसायकल हवेत उंच उडाली व तिने पेट घेतला यामध्ये मोटारसायकल जळून पुर्ण खाक झाली . कारचालक घनश्याम हनुमंत निकम रा पंचवटी नाशिक हे जखमी झाले असून त्यांच्यांवर नांदगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार चालू आहे.
नांदगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून पुढील पो. नि. रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शना खाली पो. ह. राजू मोरे हे करीत आहे.

अजून बातम्या वाचा..

आता करता येणार १,२ गुंठे जमिनीचा व्यवहार ; ३ गुंठ्याची अट औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द

आता करता येणार १,२ गुंठे जमिनीचा व्यवहार ; ३ गुंठ्याची अट औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द

जमीन खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. काही तुकड्यात तुम्हाला जमीन खरेदी करता येणार आहे....

read more
करंजवण योजना :आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश ; १५% लोकवर्गणी माफ करण्याची शासनाकडे विनंती ; मंत्री महोदयां चे सकारात्मक आश्वासन

करंजवण योजना :आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश ; १५% लोकवर्गणी माफ करण्याची शासनाकडे विनंती ; मंत्री महोदयां चे सकारात्मक आश्वासन

आमदार सुहासआण्णा कांदे यांनी मनमाड शहराची विकासगंगा ठरू पाहणाऱ्या करंजवण योजनेसाठी मुख्यमंत्री,...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]