loader image
[ays_poll id=7]

डीबीटी पोर्टलवरील चालू शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जातीचे शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेचे प्रलंबित अर्ज त्वरित निकाली काढून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय द्या : अध्यापकभारती

May 21, 2022


सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती- शिक्षण शुल्क,परीक्षा शुल्क अर्ज महा-डीबीटी पोर्टल मध्ये विहित वेळेत निकाली न काढण्यात आल्यामुळे (No Action Taken) सदर अर्ज प्रणालीमध्ये कायमस्वरूपी जतन करून (Archieve) संबंधीतांच्या लॉगीनवर रद्दबातल (rejected) दर्शविण्यात येत आहे.हि त्रुटी संबंधित विभागाची असून सदर बाबीसाठी सर्व मागासवर्गी ज्या विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित खात्याने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये विनाविलंब शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी अशी मागणी राष्ट्रीय बालक विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षण प्रशिक्षण संस्था अध्यापक भरतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी सामाजिक न्याय मंत्री मुख्यमंत्री व संबंधित विभागाच्या आयुक्त व मुख्य सचिवांची निवेदनाद्वारे केली आहे.
सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात प्रवेशित बहुतांश विद्यार्थ्यांचे पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण होत आले आहे. विद्यार्थ्यांना वारंवार महाविद्यालयाकडून सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाची शुल्क मागणी होत आहे. महाविद्यालयीन प्रवेशाच्या वेळी जमा कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यात येत आहे. शिक्षण शुल्क जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

◆सदरील समस्या ही बहुतांशरित्या समाजकल्याण नाशिक विभागातील कृषी पदवी सह उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे.
आपणांस नम्र निवेदन करतो की,डीबीटी पोर्टलवरील सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जातीचे शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेचे प्रलंबित अर्ज त्वरित निकाली काढून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय मिळावा हि विनंती.

महाराष्ट्र शासनाने या संदर्भात
महाविद्यालय स्तरावरून समाजकल्याण विभाग नाशिक यांना पुढील क्रमांकाचे पत्र पाठवण्यात आले आहेत त्याचे काटेकोर अंबालबजावणी करण्यात यावी असे शरद शेजवळ यांनी केली आहे.

◆COAB/जागेवरील प्रवेश फेरी/894/2020-21 Date:- 13/10/2020

◆COAB/शिष्यवृत्ती/77/2021-22 Date:- 31/12/2021

◆COAB/जागेवरील प्रवेश व ऑटोरिजेक्ट/187/2021-22 Date:-26/04/2022

राज्याचे मुख्य सचिव,
सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
.