Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार सुहासआण्णा कांदे यांचेकडून एस.टी.डेपो कर्मचाऱ्यांसाठी वॉटर फिल्टर भेट

May 21, 2022

मनमाड एस.टी. डेपोत कर्मचारी संख्या मोठी असून येथील कर्मचाऱ्यांच्या पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याकारणाने कर्मचारी वर्गास अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे एसटी डेपोतील सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीने आमदार सुहासआण्णा कांदे यांच्याकडे स्वयंचलित वॉटर फिल्टर युक्त पेयजल सुविधा करून देण्याची प्रमुख मागणी एस.टी. कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यांच्या या मागणीच्या अनुषंगाने आमदार सुहासआण्णा कांदे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्टीलचे वॉटर फिल्टर मनमाड डेपोला सप्रेम भेट दिले होते. परंतु काही दिवसातच एस.टी. कर्मचारी संप झाल्याने त्यांची जोडणी व लोकार्पण करण्याचे राहून गेले होते. आता परत सर्व डेपो सुरळीत सुरू झाल्यानंतर त्याची संपूर्ण जोडणी करून लोकार्पण सोहळा उपजिल्हाप्रमुख संतोष भाऊ बळीत यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जि. संघटक राजाभाऊ भाबड, शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे, संघटक लोकेश साबळे, महेंद्र गरुड, सचिन दरगुडे, महेश बोराडे, टगु दरगुडे, विलास शेळके, कुणाल विसापूरकर उपस्थित होते.
कर्मचारी वर्गाच्या वतीने आगारप्रमुख लाडवंजारी साहेब,अनिल सानप, विजय शेळके, जना सरोदे, सुरेश शिलावट, रवी आरोटे, पगारे, अविनाश सरोदे, गौरव शिरोळे, चेतन जाधव, व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आगारप्रमुख लाडवंजारी साहेब यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार साहेबांचे धन्यवाद व्यक्त केले. शिवसेना पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आभार व्यक्त केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या  मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजस ठाकरे यांनी पुणे येथे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सर्व...

read more
रामतीर्थ आणि काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान:- डॉ.भारती पवार

रामतीर्थ आणि काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान:- डॉ.भारती पवार

प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या...

read more
के आर टी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली.

के आर टी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. मुख्याध्यापक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]