loader image
[ays_poll id=7]

गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार योजनेत युवामित्र संस्थेच्या माध्यमातुन मोरझरच्या महीला सरपंचांनी पटकावला जिल्ह्यात प्रथम क्रमांक !

May 21, 2022


नांदगावच्या दक्षिण भागातील मोरझर येथे युवा मित्र संस्थेने जलसमृद्धीतून विकासाकडे या उपक्रमांतर्गत जलसाठा समृद्ध करण्यासाठी गावातील लेंडी नदी व सिमेंट बंधारे पाझर तलावातील गाळ काढून खोली वाढवण्याच्या कामात मोरझरच्या सरपंच सौ.लिना समाधान पाटील यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मोठे काम करुन घेत आपल्या कामाची चुणूक दाखविली असे युवामित्र संस्थेचे अधिकारी तुळशिराम घागरे यांनी सांगितले.

मोरझर गाव दुष्काळाच्या खाईतुन मुक्त करण्यासाठी या योजनेची यशस्वी अंमंलबजावणी करण्यात आली. टाटा ट्रस्ट व गॅलक्सी या दोन संस्थांनी यासाठी सीएसआर निधी उपलब्ध करून दिला आहे.
युवा मित्राच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरझर येथील गावाजवळील नदीच्या खोली करणाच्या कामाचा प्रारंभ दोन महीण्यापुर्वी करण्यात आला होता. वर्षनुवर्ष साचत असलेल्या गाळामुळे गावातील पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीच्या पाण्यासाठी तलावाचा उपयोग होत नव्हता .सरपंच व स्थानिक शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन युवा मित्रची जलसमृद्धीतुन विकासाकडे ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला होता. साधारण पणे नदी ,नाले, ६ सिमेंट बंधारे,३ मातीनाला बांध असे एकत्रितपणे २ किलोमिटरचे खोलीकरणाचे काम केले .शेतकऱ्यांनी गाळ वाहुन नेत जमीनी सुपीक बनविल्या .त्याच बरोबर साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली.

महीला सरपंच काय करु शकते याची प्रचीती मोरझर गावात आली जिल्ह्यातील सरपंचांनी सौ.पाटील यांचा आदर्श घ्यावा असे गौरोदगार युवामित्रच्या कार्यकारी संचालिका मनिषा पोटे यांनी काढले तर सरपंच सौ.पाटील यांनीही युवामित्र च्या सर्व आधिकारी,कर्मचारी यांचे आभार मानले.

या वेळी युवा मित्रचे पदाधिकारी तुळशीराम घागरे ऋषिकेश डांगे कमलेश काळे ,सिध्दार्थ पतंगराव ग्रामसेविका सोनाली गावंडे,तलाठी निकम,कृषीसहाय्यक थोरात,पोलीसपाटील महेंद्र चोळके,सुर्यभान चोळके,कैलास चोळके,वाल्मिक गायके,वसंत चोळके,सुभाष चोळके,रामनाथ चोळके,सतिष चोळके,दत्तात्रय चोळके,कचरु निकम,मुकुंद पाटील,योगेश निकम,देविदास चोळके,गणेश निकम,गोपी लोहकरे,बाळु निकम,नाना पावशे,नितीन चोळके,रामभाऊ लोहकरे.हेमंत चोळके,सुनिलचोळके,उमेश चोळके आदी उपस्थित होते.गाळ उपसा समीतीचे अध्यक्ष सचिन चोळके यांनी आभार मानले.

युवामित्र संस्थेचे अधिकारी मनिषा पोटे मॕडम ,रुषीकेश डांगे तुळशीराम घागरे,अमोल काळे व कर्मचारी यांच्या योग्य नियोजनातुन मोरझर येथील मोठ्या प्रमाणात नदी नाले बंधारे याचे खोलीकरण करु शकलो यात आम्हांला मोरझर येथील ग्रांमस्थाचे वेळोवेळी सहकार्य झाले .तसेच नांदगाव तांलुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदेसाहेब जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे व समाधान पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. गाळयुक्त शिवार गाळमुक्त धरण असा उपक्रम मोरझर येथे राबवण्यात आला त्यामुळे मी पुन्हा युवामित्र संस्थेचे आभार मानते गावांचा विकास हेच आमचे धेय्य आहे.

  • सौ.लिना समाधान पाटील (सरपंच) मोरझर ग्रामपंचायत,नांदगाव.

 

मोरझर ता.नांदगाव च्या सरपंच सौ.लिना समाधान पाटील यांनी युवामित्र संस्थेकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन गावात नदी,नाला,बंधारे यांचे खोलीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात करुण घेतले.युवामित्र संस्था ही जील्हाभरातकाम करत असुन मोरझर गावाने जील्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल सरपंच व ग्रामस्थांचे युवामित्र संस्थेच्या वतीने आभार मानतो व आभिनंदन करतो.सरपंच सौ.पाटील यांचे प्रमाणे इतर सरपंचांनी लाभ घ्यावा.

  •  तुळशिराम घागरे , क्षेत्र समन्वयक, युवामित्र संस्था ,सिन्नर

 


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
.