loader image
[ays_poll id=7]

बेरोजगार तरूण विद्यार्थ्यांसाठी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन

May 21, 2022

नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे आणि गुरुकुल पॉलिटेक्निक नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार तरूण विद्यार्थ्यांसाठी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून आजपर्यंत शेकडो तरुणांना नाशिक इगतपुरी सिन्नर परिसरातील कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. शनिवारी शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय मनमाड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यास मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांनी मोठा प्रतिसाद देत २६५ विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

याप्रसंगी विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अंबड सातपूर गोंदे, इगतपुरी, वाडीवऱ्हे, सिन्नर, दिंडोरी येथील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. उत्तम पगार व इतर सुविधा या कंपन्यांमध्ये उपलब्ध असणार आहेत.मतदार संघातील प्रत्येक बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नोकरी रोजगार मेळावा आयोजित करण्यात येतो. तेव्हा या संधीचा लाभ प्रत्येकाने घ्यावा, मेळाव्यास उपस्थित न होऊ शकलेल्या तरुण-तरुणींनी शिवसेना संपर्क कार्यालय नांदगाव मनमाड व मालेगाव येथे संपर्क करावा,असे आवाहन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले आहे. या मेळाव्या प्रसंगी महाराष्ट्र कामगार सेनेचे श्री.रवी देवरे यांसह मेळावा यशस्वी करण्यासाठी मनमाड च्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
.