loader image
[ays_poll id=7]

इंधन दर : केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारचाही जनतेला दिलासा

May 23, 2022


केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. केली आहे.

शनिवारी केंद्र सरकराने अबकारी कर कमी करत पेट्रोलच्या दरात ९.५रुपयांची तर डिझेलच्या दरात ७ रुपयांची कपात केली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राज्य सरकारांना करात कपात करण्याची विनंती केली होती. त्यानंतर केरळ आणि राजस्थान सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केला. दरम्यान, महाराष्ट्रात इंधनावरील करामुळे पेट्रोल आणि डिझेल शेजारच्या राज्यांपेक्षा तुलनेनं महाग मिळतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही कर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी होत होती. त्यानंतर राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या करात सूट जाहीर केली. त्यामुळे आता पेट्रोल २.०८ तर डिझेल १.४४ रुपयांनी स्वस्त होईल.

दरम्यान, राज्य सरकारच्या कर कमी करण्याच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.