Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

डाक कर्मचाऱ्यांना ‘इतका’ दिवाळी बोनस

Oct 20, 2026

केंद्र सरकारने डाक विभागातील पात्र कर्मचाऱ्यांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा उत्पादकता-संलग्न बोनस (पीएलबी) जाहीर केला आहे. या निर्णयानुसार पात्र कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या वेतनाइतकी बोनसची रक्कम मिळणार असून, कमाल बोनस १३ हजार ८१६ रुपये असेल. डाक विभागाने १६ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

या बोनसचा लाभ गट ‘क’ (ग्रुप सी), अराजपत्रित गट ‘ब’ आणि मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय ग्रामीण भागात कार्यरत ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) तसेच पात्र पूर्णवेळ आणि तात्पुरत्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचाही या योजनेत समावेश आहे.

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]