loader image
[ays_poll id=7]

शालार्थ आय.डी.देण्यासाठी जाचक अटी रद्द करून शिक्षणाधिकाऱ्यांनाच कर्मचारी शालार्थ आय.डी देण्याचे अधिकार द्या : अध्यापकभारतीची मागणी

May 25, 2022


नाशिक विभागात शिक्षकांना शालार्थ आय.डी देताना मूळ प्रस्तावाला मुळ नस्ती,दोन जास्त खप असणाऱ्या पेपरमधे जाहिराती या सारख्या जाचक अटी घालून शालार्थ आय डी करता शिक्षक कर्मचाऱ्यांची नाहक प्रचंड अडवणुक केली जात असून शिक्षणाधिकारी यांनी सदर बाबी तपासूनच व्यक्तिक मान्यता (अपरोवल) दिलेले असते तरी देखील कर्मचारी शालार्थ आय.डी मिळवण्यासाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करून तो उपसंचालक कार्यालयात सादर करतांना पुन्हा नव्याने तेच-तेच कागदपत्रे व अटी लावून कर्मचाऱ्यांना व्यक्तिक मान्यता मिळून देखील पगार-वेतनाकारता विना कारण वेठीस धरले जात आहे.सदर बाब अत्यंत गंभीर असून वेतन अधिकारापासून अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागते आहे ह्या बाबीकडे आपण लक्ष घालून शालार्थ आय.डी.देण्यासाठी जाचक अटी रद्द करून शिक्षणाधिकाऱ्यांनाच कर्मचारी शालार्थ आय.डी देण्याचे अधिकार द्या अशी मागणी अध्यापकभारतीच्या महिला शिक्षिका प्रमुख प्राध्यापिका के.एस.केवट यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. जि.प.शिक्षणाधिकारी यांची व्यक्तिक मान्यता असतांना अनाठायी कारणे व कागदपत्रे मागवून शालार्थ आय डी करता कर्मचाऱ्यांना वेठीस न धरता सक्षम (शिक्षणअधिकारी) यांची मान्यता अंतिम मानून त्याच आधारे अर्थात व्यक्तिक मान्यता (अपरोवल) च्या आधारे विनाअट शालार्थ आय डी प्रदान करण्यात यावे व जो शासकीय अधिकारी (शिक्षणाधिकारी) कर्मचारी व्यक्तिक मान्यता देतो त्यांनाच शालार्थ आय डी चा अधिकार देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय बालक-विद्यार्थी पालक,शिक्षक,शिक्षण,प्रशिक्षण संस्था अध्यापकभारती च्या वतीने केवट यांनी केली आहे.

ज्या मान्यता शंकास्पद असतील त्या मान्यता ज्या अधिकाऱ्यांनी दिल्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी आमच्या शिक्षकांना वेठीस का धरता ह्या जाचक अटी काढुन सर्वांना शालर्थ आय .डी देण्याचे अधिकार सक्षम अधिकारी शिक्षणाधिकारी यांनाच देण्यात यावेत अशी मागणी अध्यापकभारतीच्या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या :
१.तत्कालीन शिक्षण उपसंचालक यांनी शालार्थआय.डी.मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी काढलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांची नावे
ऑनलाईन समाविष्ट करणे.
२. दि.२८/०१/२०१९ च्या शासन निर्णयानुसार शिक्षकेत्तर पदांचा (शिपाई वगळून)आकृतिबंध निश्चित झालेला असतांना तसेच दि.०७/०३/२०१९ च्या शासन निर्णयानुसार स्पष्ट आदेश असतांना व मा.शिक्षण संचालक यांनी शिक्षकेत्तर संवर्गाची (शिपाई वगळून)पदे मंजूर करून दिलेली असतांना,शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याचे प्रस्ताव, भरती बंदी व आकृतिबंध निश्चित नाही असे कारण दाखवून अमान्य केली जातात.
३.विना अनुदानित शाळांना अनुदान देत असतांना रोस्टर पद मंजूरी व इतर बाबी तपासूनच अनुदानास पात्र ठरविले जाते परंतु शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून पद भरती बंदी, दोन वर्तमानपत्रात व सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रात जाहिरात पाहिजे अशा अनावश्यक त्रुटी लावून शालार्थ प्रस्ताव अमान्य केले जात आहेत.
४.२०% अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांच्या मान्यता ह्या फार
पुर्वीच्या असून,सदर मान्यतांच्या मूळ वैयक्तिक मान्यता नस्त्या मागविल्या जात आहेत व सदर नस्त्या प्राप्त न झाल्याने शालार्थ प्रस्ताव अमान्य केले जात आहेत.
५.दि.११/१२/२०२० च्या शासन निर्णयानंतर शिपायांची पदे ,भत्ता,मानधन तत्वावर भरण्याचे शासनाचे आदेश आहेत परंतु त्या
पुर्वीच्या नियुक्त्या असतील तर त्यांना शालार्थ आय.डी.देणे गरजेचे आहे.परंतु सदरच्या प्रस्तावांना अमान्य केले जात आहे.त्यांना शालार्थ आय.डी.देण्यात यावा


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.