Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील आमोदे – सतारी शिवारात १० मोरांच्या मृत्यूने हळहळ

May 28, 2022

मनमाड (अजय सोनवणे) – भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या १० मोरांचा नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील आमोदे शिवारात मृत्यू झाला आहे.साधारण अडीच वर्षे वय असलेल्या ४ नर आणि ६ मादी जातीच्या मोरांचा त्यात समावेश आहे..आमोदे गावच्या सतारी शिवारात सकाळी मृत्युमुखी पडलेले हे मोर शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले.याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विखुरलेले सर्व मोर एकत्रित करत त्यांचा पंचनामा केला,दरम्यान मोरांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी विषबाधा झाल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान, वनविभाग व वैद्यकीय पथकाकडून मृत्यू झालेल्या मोरांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे..दरम्यान, एकाच वेळी दहा मोरांचा मृत्यू झाल्याने वन्यप्रेमिंकडून हळहळ व्यक्त होत आहे…

अजून बातम्या वाचा..

मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

  मनमाड - तालुका विधी सेवा समिती व मनमाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड येथील...

read more
मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

मनमाड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी आणि मनमाड शहराचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]