महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या 16 वर्षा आतील आमंत्रितांच्या स्पर्धेत मनमाड येथील रुषी शर्मा , वेदांत कांदळकर व अंशुमान सरोदे या खेळाडूंची हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे निवड करण्यात आली आहे. वेगवेगळ्या निवड सामन्यात उत्तम प्रदर्शन केल्यानंतर या खेळाडुंना जिल्हासंघात स्थान देण्यात आले. सातत्यपुर्ण कामगिरी व आपल्या मेहनतीच्या बळावर मनमाडच्या या खेळाडूंनी हिंगोली जिल्ह्यासाठी खेळण्याचा मान मिळवला.
रविवार दि. २९ मे २०२२ पासुन हिंगोली जिल्हा संघाचे सामने पुणे येथे सुरु झाले असून ह्या सामन्यात रूषी शर्मा व वेदांत कांदळकर सहभागी होऊ शकेल. या खेळाडुमार्फत राज्यपातळीवर खेळणारा खेळाडु आपल्या मनमाड शहरास लाभो अशी आशा खेळाडुवर्गातुन केली जात आहे. या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक व भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे संचालक श्री. सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सर यांचे मार्गदर्शन खेळाडुंना लाभले.
भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ इरफान मोमीन , मार्गदर्शक गणेश धात्रक ,राजाभाऊ पगारे , संजय निकम , सुनीलभाऊ पाटिल , श्रेणिक बरडिया , वाल्मिक रोकडे , परवेज शेख , कौशल शर्मा , हबीब शेख , शुभम गायकवाड , सिद्धार्थ बरडीया , परेश राऊत , नितीन आहेरराव , तय्यब शेख , रोहित पवार यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले व खेळाडूंना पुढिल सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अनकवाडे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…
मनमाड -येवला महामार्गावर अनकवाडे गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी...










