loader image
[ays_poll id=7]

नवज्ञानाचा उपयोग महावितरणच्या विकासासाठी करावा : मुख्य अभियंता वादिराज जहागिरदार

Jun 1, 2022

महावितरणच्या माध्यमातून स्थापत्य अभियंता म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली आहे, त्याचसोबत प्रथमच दीर्घ कालावधीचे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध माहिती व ज्ञान मिळाले असून, स्थापत्य अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या नवज्ञानाचा उपयोग महावितरणच्या विकासासाठी करावा असे आवाहन स्थापत्य विभागाचे मुख्य अभियंता वादिराज जहागिरदार यांनी केले. महावितरणच्या एकलहरे येथील सुरक्षा व प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित १८ एप्रिल ते ३१ मे २०२२ या सहा आठवड्याच्या महावितरणमधील स्थापत्य अभियंते यांच्या पहिल्या अभिक्रम आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर एकलहरे येथील सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर व कार्यकारी अभियंते नरेंद्र सोनवणे व निलेश चालिकवार उपस्थित होते.

महावितरण ग्राहकांना अखंडित सेवा देण्याचे कार्य करीत आहे, त्यामध्ये स्थापत्य विभागाकडून दर्जेदार कामे करण्याचे तथा कार्यामध्ये तडजोड न करता प्रामाणिकपणे आपली सेवा बजावून स्थापत्य विभागाची प्रतिमा उंचावण्याचे कार्य करा असेही मुख्य अभियंता वादिराज जहागिरदार यांनी सांगितले.

या प्रशिक्षणामधून सकारात्मक बाबी घेऊन आपण आपल्या कार्यक्षेत्रात पोहोचवल्या पाहिजे. आजच्या ताणतणावाच्या काळात आनंदाने प्रशिक्षण घेऊन दैनंदिन कार्य व कर्तव्याचा आनंद घेवून महावितरण व स्वतःचा नावलौकिक वाढविला पाहिजे अशी अपेक्षा मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली. सुरुवातीला प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणा दरम्यान झालेल्या घडामोडीची तयार केलेली चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. नाशिक परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे, बळवंत गाडगीळ, प्रशिक्षणार्थी, व्यासपीठावरील मान्यवर यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद झाल्टे व सुरक्षा व प्रशिक्षण केंद्र येथील कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण समन्वयक अतिरिक्त कार्यकारी अभियंता कौस्तुभ आचार्य यांनी तर आभार प्रशिक्षणार्थी अभियंता प्रविण साबळे यांनी मानले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.