loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी कमलाकर (आबा)देसले यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने रात्री निधन

Jun 4, 2022


महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी कमलाकर (आबा)देसले यांचे शुक्रवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने रात्री निधन झाले. सायंकाळी अचानक छातीत दुखु लागल्याने त्यांना सटाणा रोडवरील संकल्प हाँस्पीटल मध्ये अँडमीट करण्यात आले होते.उपचार सुरु असतांनाच त्यांचे निधन झाले. शनिवारी सकाळी ११-०० वाजता झोडगे येथे अंत्यसंस्कार होणार आहे. कमलाकर आबा हे जनता विद्यालयात अनेक वर्ष सेवा केली. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना कविता लिखाणाचे मार्गदर्शन काय केले. अहिराणी साहित्यात ही त्यांनी लेखन केले. कविता व गझल आणि ललित लेखनात त्यांचा चांगला हातखंडा होता.त्यांच्या कवितांना ते स्वतः चाल लावत असत.कविता ह्या गेय असल्यामुळे त्या रसिकांच्या मनावर राज्य केले. खलील मोमीन व कमलाकर देसले यांचा पत्रव्यवहार सर्वश्रुत आहे.विविध साहित्य संमेलनात त्यांनी सहभाग घेऊन गाजवली. विविध ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भुषविलीत.ते उत्तम सुत्रसंचालन करत असत.तसेच ते धार्मिक वृत्तीचे होते.त्यांनी विविध अभंगाचे निरुपण केले. आईवरची व दिवली या कविता विशेष प्रसिद्ध होत्या.अशा महान साहित्यिकाच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात पोकली निर्माण झाली. आबांना भावपूर्ण श्रध्दांजली


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.