loader image
[ays_poll id=7]

“आकांक्षा” पुढे गगन ठेंगणे…..

Jun 7, 2022


आकांक्षा व्यवहारे सुवर्णकन्या
लहानपणा पासूनच थोडीशी लाजरी बुजरी असलेली आकांक्षा सातत्याने सराव आणि मेहनतीच्या जोरावर राज्य व राष्ट्रीय पातळीवर एवढी मजल मारेल असे माझ्या परिवारात कोणालाच वाटले नव्हते, लहान पणापासून शालेय अभ्यास व कुठल्याही प्रकारचा एक व्यायाम मुलांकडून करून घ्यायचा असे मनात पक्के ठरलेलं असल्यानं सुरवातीला योगा चे प्रशिक्षण देत शारीरिक व मानसिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच योगाच्या तालुका व जिल्हास्तरीय वयोगटांच्या स्पर्धेत सहभागी होत आकांक्षाने अनेक सुवर्णपदकांची कमाई केली पण राज्यस्तरीय स्पर्धेतील यश मात्र अर्ध्या एक गुणांनी हुलकावणी देत असे मग लहान वयातच वेटलिफ्टिंग चा सराव सुरू केला साधारण वयाच्या 11व्या वर्षी माझ्या बरोबर सुरू केलेला प्रयत्न कारण मुळातच शरीर रचना नाजूक पण न चुकता दररोजच्या सरावामुळे काही महिन्यात चांगले बदल अवघड अश्या वेटलिफ्टिंग खेळाचे तंत्र आत्मसात केल्याने प्रगती होत राहिली त्याच काळात काही दानशूर पालकांनी लहान मुलांच्या व्यायामासाठी लागणाऱ्या फायबर च्या वेटलिफ्टिंग प्लेट्स चा खर्च उचलल्याने आकांक्षा व तिच्या बरोबर सराव करणाऱ्या अनेक लहान मुलांनी अतिशय उत्साहात वेटलिफ्टिंग चे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली त्या दरम्यान सांगली येथे एक 12 व 14 वर्षे वयोगटातील महाराष्ट्रातील व कदाचित भारतातील पहिलीच राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा सांगली येथे 7ते10 सप्टेंबर 2018 मध्ये संपन्न झाली व आपल्या पहिल्या च स्पर्धेत आकांक्षा ने 12 व 14 दोन्ही वयोगटांच्या स्पर्धेत 30 किलो वजनी सुवर्णपदक जिंकत वेटलिफ्टिंग खेळात दमदार सुरवात केली पण 2019 मध्ये वयोगटांच्या कुठल्याही स्पर्धा झाल्या नाही व 2020 व 2021 मध्ये बऱ्याच अंशी कोरोना सारख्या महामारी मुळे सरावात बराच खंड पडला व एकही जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्पर्धा पार पडू शकली नाही दरम्यान कोरोना च्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे 16 जुलै 2021ला राज्यस्तरीय निवड चाचणी पार पडली 40 किलो वजनी गटात महाराष्ट्रातून दोन मुलींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली निवड चाचणी असल्याने पदकांचा काही प्रश्नच नव्हता 9ते13 ऑगस्ट 2021 पतियाळा पंजाब येथे बऱ्याच मोठ्या खंडानंतर राष्ट्रीय स्पर्धेचे भारतीय क्रीडा प्राधिकरण पतियाळा पंजाब येथे अतिशय कठीण अशा कोविड च्या नियमांचे पालन करताना आर टी पी सी आर तसेच एकही प्रेक्षक किंवा खेळाडू स्पर्धेला उपस्थित राहणार नाही असे काटेकोर नियोजन करीत व पात्रता निकष ही फारच जास्त ठेवल्याने खेळाडूंचा कस लागला अतिशय भीतीयुक्त वातावरणात पार पडलेल्या स्पर्धेत आकांक्षा ने आपल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत नवीन उच्चांकी कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले व भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी तिची निवड करण्यात आली आतंरराष्ट्रीय स्पर्धा सिंगापूर येथे होणार होत्या परंतु त्या दरम्यान पुन्हा कोविड चे प्रमाण वाढल्याने स्पर्धा रद्द करण्यात आल्या व भारतीय संघात निवड होण्याची संधी हुकली दरम्यान कोविड सदृश्य परिस्थितीत ही घरीच थोडा व्यायाम सुरू होता कारण व्यायामशाळा सुरू करण्याची परवानगी नव्हती वेटलिफ्टिंग चा सराव करण्यासाठी विशिष्ट साहित्य लागत असल्याने सरावात थोडा खंड पडला परंतु 3ते6डिसेंबर 2021 मलकापूर ला झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा आकांक्षा ने लक्षवेधक कामगिरी करीत 40 किलो युथ मुलींमध्ये सुवर्णपदक पटकावले व स्पर्धेतील युथ मुलींचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमानही मिळवून भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात स्थान सरस कामगिरी च्या जोरावर पटकावले.भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्रांमध्ये वेटलिफ्टिंग च्या खास प्रशिक्षणासाठी तिची निवड करण्यात आली भारतातील 20 सर्वोत्कृष्ट खेळांडूमध्ये ही आकांक्षा ने स्थान पटकावले असून भुवनेश्वर येथे 19 मार्च ते 31 मार्च दरम्यान झालेल्या राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा ने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 40 किलो वजनी गटामध्ये सहा नवीन राष्ट्रीय विक्रमांसह सुवर्णपदक पटकविण्याचा भीम पराक्रम केला व युथ मुलींच्या 10 वजनी गटांमध्ये बेस्ट लिफ्टर म्हणजेच सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकाविला राष्ट्रीय स्तरावर आजपर्यंत महाराष्ट्रातील मोजक्याच खेळाडूंना हा बहुमान मिळाला आहे भुवनेश्वर येथे मिळविलेल्या सुवर्णपदकाच्या जोरावर आकांक्षा ची मेक्सिको लिओन येथे होणाऱ्या जागतिक युथ स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली असून सध्या ती पंजाब पतियाळा येथे कसून सराव करत आहे
लिओन मेक्सिको येथे होणाऱ्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आकांक्षा ची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे अतिशय कमी वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारी आकांक्षा मनमाड ची पहिलीच खेळाडू ठरली आहे


अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.