loader image
[ays_poll id=7]

श्री गंगा दशहारा निमित्त चांगल्या पर्जन्यवृष्टीसाठी नदीचे पूजन !

Jun 10, 2022

मनमाड : भारत देशाची मुख्य आणि पवित्र नदी असणारी आणि या नदीला पुरातन काळापासुन दक्षिण गंगा म्हणुन ओळखले जाते अशी ‘गोदावरी’ नदी आहे , सर्व दोषांचे निवारण करणारी भगवान शंकराची मानसकन्या ब्रह्मवाहिनी म्हणून ओळखली जाते. गोदावरी नदी श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ते राजमहेंद्री ब्रह्मवाहिनी म्हणून गोदावरी विहारते.

गोदावरीच्या काठी असलेली भूमी व गावे तिच्या पाण्याने पवित्र झालेली आहेत. हिच्या काठावर देव व पितर यांना सद्गती प्राप्त होते.भारत देशात सर्वत्र पूजापाठ करतांना संकल्प उच्चारतांना काल, ग्रह यांच्या उच्चाराबरोबर गोदावरीच्या उत्तरेस अथवा दक्षिणेस किंवा गोदावरीच्या काठी असा उल्लेख केल्याशिवाय देवादिकांना ते स्थान समजत नाही. श्री गणपती व श्री वरुण देवता यांची थोरली बहीण असल्याने हिच्या मार्फत गेल्यास ते लवकर पर्जन्यवृष्टी करतात , असे मानले जाते.

देशभरात जेष्ठ शु. १ ते जेष्ठ शु. १० या कालावधीत ‘श्री गंगा दशहारा’ हा उत्सव साजरा केला जातो. सालाबादप्रमाणे यावर्षी ही श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) मनमाड येथे गेल्या दहा दिवसापासून श्री गंगा गोदावरीच्या पवित्र जलाच्या कलशाची स्थापना व पूजन केले जात होते. ‘श्री गंगा दशहरा’ उत्सवाच्या सांगते निमित्त गावातील रामगुळणा व पांझण नदीच्या काठावर हा कलश मिरवणूकीसहीत नेऊन तेथे यथासांग मानसन्मान सेवेकाऱ्यांद्वारे करण्यात आला तसेच देशात,गावात सुपर्जन्य वृष्टी साठी प्रार्थना करण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.