Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगांव नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांच्या इमारत दुरूस्ती साठी दोन कोटी पन्नास लक्ष रुपये मंजूर तर मनमाड नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळा साठी सात कोटी पन्नास लारव रूपये मंजूर

Jun 10, 2022

याबाबत वृत असे की नांदगांव नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळेच्या ईमारती या खुपच मोडकळीस आल्या होत्या विद्याथ्यांचे फारच हाल होत होते. या शाळांना काही महिन्यापुर्वी सौ अंजुम कांदे यांनी समक्ष भेट देत पाहणी केली होती . यात शाळांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे त्यांना जाणवले, शाळेच्या इमारती जुन्या झाल्यामुळे मोडकळीस आलेल्या आहेत, या मुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे असुरक्षित वाटू लागले होते .त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे लक्षात आले, एकंदरीत सर्व परिस्थिती सौ.कांदे यांनी आ. सुहास कांदे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आ .सुहास कांदे यांनी सर्व शाळांची माहिती गोळा करून शासनाकडे सर्व इमारतींच्या नूतनीकरणाची मागणी पत्राद्वारे केली तसेच नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून परिस्थिती समजावून सांगितली असता बुधवार दिनांक आठ जून रोजी मनमाड व नांदगाव नगरपरिषद शाळांच्या ईमारत दुरुस्ती साठी एकूण जवळपास दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यतेची प्रत प्राप्त झाली आहे.
आ.सुहास कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव मनमाड शहरातील जवळपास सर्वच शाळांचे नुतनीकरण होणार असल्या कारणाने शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.नांदगाव नगरपालिकेच्या शाळासाठी दोन कोटी पन्नास लक्ष तर मनमाड नगरपालिकेच्या शाळासांठी सात कोटी पन्नास लक्ष रूपये मंजूर झाल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

आ .सुहास कांदे यांची प्रतिक्रिया
नगर परिषद शाळेच्या मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे धोक्याचे असल्याचे लक्षात येताच नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली आणि साहेबांनी त्वरित त्यास मंजुरी दिली लवकरच सर्व शाळेच्या इमारत दुरुस्तीचे काम सुरू होईल व विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेणे सोपे जाईल.

अजून बातम्या वाचा..

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]